आरटीई २५ टक्के मोफत प्रवेशाच्या फी संदर्भात पालक संभ्रमात l शाळा पालकाकडून फी वसूल करणार काय ? गणेशभाऊ चौकसे यांचा सवाल l खामगाव प्रतिनिधी
By -
मार्च 11, 2025
0
आर टी ई २५ टक्के प्रवेशाची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून मिळत नसल्यामुळे शाळा पालकाकडून फी घेणार याबाबत महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनच्या (मेस्टा)वतीने नुकतेच शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.या बातमीने पालक संभ्रमात झाले असून त्यांनी गणेशभाऊ चौकसे यांची याबाबत भेट घेऊन होणाऱ्या अन्यायाबाबत वाचा फोडण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली. त्यामुळे आरटीई कायदा असताना संबंधित शाळा पालकाकडून फी वसूल करणार काय? असा सवाल गणेशभाऊ चौकसे यांनी उपस्थित केला आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यासाठी राखीव असतात. ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न निश्चित मर्यादेपेक्षा कमी आहे ते आरटीई प्रवेशासाठी पात्र असतात.प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत आरटीई प्रवेश प्रक्रिया दरवर्षी राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ जागावर मोफत प्रवेश देण्यात येतो या प्रवेशित मुलांच्या शुल्काची प्रतिकृती राज्य सरकारकडून शाळांना करण्यात येते. शाळेत प्रवेश घेतलेल्या कोणत्याही मुलाला प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही वर्गात रोखून ठेवता येणार नाही किंवा शाळेतून काढून टाकता येणार नाही. या कायद्यामुळे मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळत आहे. २५ मोफत प्रवेश प्रक्रियेत राज्यातील ८ हजारापेक्षा जास्त शाळांचा समावेश असून सुमारे १ लाख पेक्षाही जास्त विद्यार्थी यासाठी पात्र ठरत असतात. मोफत प्रवेश प्रक्रियेची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडून संबंधित शाळांना दिले जाते. परंतु शासनाने मागील पाच ते सहा वर्षापासून ची प्रतिपूर्ती रक्कम शाळांना दिलेली नाही त्यामुळे आरटई रक्कम शाळेला न मिळाल्याने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पालकाकडून शाळा ही वसूल करणार याबाबत महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) च्या वतीने शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात शाळेला आरटीई च्या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पालकाकडून फी घेतल्या जाईल तर जेव्हा सदर सत्राची प्रतिपूर्ती शाळेला देईल तेव्हा शाळा पालकांना ती फी परत करेल असेही नमूद करण्यात आले आहे. वास्तविक आरटीई मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थ्यांचे पालक हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल वंचित घटकातील आहेत त्यांच्याकडे शाळेची फी भरण्या एवढी रक्कम असती तर त्यांनी अगोदरच त्यांचे मुले खाजगी शाळेत टाकले नसते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. गणेशभाऊ चौकसे यांनी यापूर्वी आरटीई प्रवेशा संदर्भात अनेक वेळा शासनाकडे विविध समस्याबाबत पाठपुरावा केला आहे. यावेळी गणेशभाऊ चौकसे यांनी पालकांना धीर देत कोणत्याही पालकावर अन्याय होणार नाही याबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करू. आर टी कायद्यानुसार संबंधित शाळा ही संदर्भात जबरदस्ती करू शकत नाही. तरी या संदर्भात संबंधित शाळांना नियमबाह्यरित्या फी वसुली न करण्याबाबत आपल्या स्तरावरून शिक्षण संचालक महाराष्ट्राचे पुणे यांना तात्काळ योग्य ते आदेश व्हावेतवेळप्रसंगी जिल्हाभर आंदोलनही करू असा इशारा गणेशभाऊ चौकसे यांनी दिला सदर निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री व संबंधित शिक्षण विभाग यांना देण्यात आलेले आहे.l फोटो - गणेशभाऊ चौकसे
