महोदय
सदर निवेदनाद्वारे आम्ही समाजवादी पार्टी नांदुरा जिल्हा बुलढाणा विभाग आपल्या ध्यानात आणू इच्छितो की, महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ३ मार्च २०२५ रोजी समाजवादी पार्टीचे राज्य अध्यक्ष आणि आमदार मा. अबू आसिम आझमी यांनी विधानसभा सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी औरंगजेब यांच्या व्यक्तिमत्त्वावर भाष्य केले.
या विधानानंतर मा. अबू आसिम आझमी यांना अन्यायकारकपणे अधिवेशनातून निलंबित करण्यात आले. त्यांनी कोणाच्याही भावना दुखावण्याचा अथवा कोणाचा अपमान करण्याचा कोणताही चुकीचा उल्लेख केला नाही. तरीदेखील त्यांनी आपल्या वक्तव्या मागे घेतले आहे.
तथापि, या घटनेनंतर त्यांना सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, ज्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मा. अबू आसिम आझमी हे एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी असून ते यापूर्वी राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत आणि चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी कधीही कोणत्याही थोर व्यक्तीचा अवमान केलेला नाही, तरीही त्यांच्याविरोधात अन्यायकारक कारवाई सुरू आहे.
महोदय,
आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की, मा. अबू आसिम आझमी यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई तात्काळ रद्द करण्यात यावी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी झेड स्तराची सुरक्षा त्वरित प्रदान करण्यात यावी.
आपल्या सहकार्याबद्दल आपण आभारी राहू.
आपला विश्वासू,
(आझाद खान पठाण)
पद: _युवा जिल्हाध्यक्ष
समाजवादी पार्टी, नांदुरा, जिल्हा बुलढाणा
