मोताळा - तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कोथळी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी लुकमान शाह यांची आज मंगळवार दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी निवड झाली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 8 महिने चालेल्या कायदेशीर लढ्याला यश येत अखेर लढाई जिंकत लुकमान शाह उपसरपंच पदी विराजमान झाले आहे.दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी सरपंच तथा अध्यासी अधिकारी ग्रामपंचायत कोथळी यांच्या स्वाक्षरी ने काढण्यात आलेल्या सभेच्या सुचना नोटीस नुसार ग्रामपंचायत कोथळी येथील दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी उपसरपंच पदाचे निवडी बाबतची प्रक्रिया अध्यासी अधिकारी यांच्या उपस्थितीत सुचित केल्या प्रमाणे सकाळी 10 वाजे पासून सुरुवात करण्यात आली होती.
परंतु सदर प्रक्रिया अध्यासी अधिकारी यांच्या सुचने प्रमाणे स्थगित करण्यात आल्याने सदर सभा उपरोक्त आदेशान्वये
सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून उपसरपंच पदाच्या निवडी बाबतची दिनांक 6 ऑगस्ट 2024 पूर्ण करण्या साठीची सभा ग्रामपंचायत कायर्यालय कोथळी येथे दुपारी 2 वाजता दिनांक 15 एप्रिल 2025 ला घेण्यात आली सभेमध्ये यापूवीं सर्व कामकाज होवून फक्त छाननी झालेल्या अर्जाची प्रसिद्धी करणे,आक्षेप घेणे सभेचे कामकाज घेऊन प्रक्रिया पूर्ण करणे बाबतची कार्यवाही करण्यासाठी सभा आयोजीत करण्यात आली होती.
तब्बल 8 महिने चालेल्या कायदेशीर प्रक्रियेत महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक नियम 1964 पोटकलम 12, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 33 (5), मा. जिल्हाधिकारी बुलडाणा यांचा अपील आदेश दिनांक 27 सप्टेंबर 2024, मा जिल्हाधिकारी बुलडाणा यांचा अपील आदेश दिनांक 17 जानेवारी 2024,मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथील रिट पिटीशन क्र 5056/2024 व दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी स्थगनादेश आदेश, मा महायक आयुक्त अमरावती यांचा आदेश 24 मार्च 2025 अन्वये दिनांक 20 मार्च 2025 ला उठविण्यात आलेल्या स्थगीती नुसार आज अखेर लुकमान शाह यांची उपसरपंच पदी निवड झाली आहे. सदरची प्रक्रिया कोथळी ग्रामपंचायत सरपंच तथा अध्यासी अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते.सदर प्रकरणात मुबंई उच्च न्यायालय खंडपीड नागपुर येथे अँड आशिष चवरे यांनी तर जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे अँड धिरज मुंदे व नवल हेलोडे यांनी काम पाहिले..
