मनाला सुन्न करणारी घटना आग लाव्याने लावली आग रात्री एक ते दोनच्या दरम्यान ची घटना प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापुर

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

दि 11 एप्रिल मध्यरात्री 1 ते 2 च्या दरम्यान ची वेळ 
मलकापूर तालुक्यातील घिर्णी बेलाड येथील 
उमेश राजाराम मुंडाळे हे त्यांच्या परिवारासह सकाळच्या साखर झोपेत असताना एका शेजारील व्यक्तीकडून घराला व गोठ्याला आग लावण्याचा प्रकार घडला..
सकाळच्या गाढ झोपेत असणाऱ्या उमेश मुंडाळे व त्यांच्या परिवाराच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी घराचे दरवाजे उघडून बाहेर धाव घेतली. 
 उमेश राजाराम मुंडाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,ते म्हणतात की आम्ही आग लागल्याच्या भीतीने घराच्या बाहेर आल्यानंतर आमच्या शेजारी राहत असलेला ज्ञानेश्वर रामधन गवर याला आम्ही आग लावताना पाहिले आहे त्यासाठी मी त्याचा पाठलाग देखील केला  परंतु तो पळून जाण्यास यशस्वी झाला असे तक्रारीत नमूद आहे..
  घराला व गोठ्याला लागलेली आग उमेश मुंडाळे त्यांचे कुटुंबीय व शेजारी यांच्या प्रयत्नांतून विझवण्यात आली परंतु यात उमेश मुंडाळे यांचा एक हात व पाय आग विझवण्याचा प्रयत्नात संपूर्ण होरपळून निघाला.
त्याचबरोबर घराला लागूनच असलेल्या गोठ्यात सुद्धा बारा ते पंधरा बकऱ्या व एक गाय आणि वासरू आगीच्या कचाट्यात  सापडल्याने ते सुद्धा आगीच्या प्रचंड दाहकतेने होरपळून निघाले.
  आधीच अपंगत्व आणि अत्यंत गरिबीची परिस्थिती असणारे उमेश मुंडाळे यांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती.
 त्यातच या राक्षसीय विकृतीने लावलेल्या आगीत उमेश मुंडाळे यांच्या घरातील हजारो रुपयांचे सामान काही महत्त्वाची कागदपत्रे त्याचबरोबर दहा ते पंधरा बकऱ्या एक गाय आणि वासरू आणि स्वतः उमेश मुंडाळे  आगीच्या तीव्रतेने क्षतीग्रस्त झाले आहेत..
 त्यामुळे घडलेल्या या सर्व प्रकारात किंबहुना लावलेल्या या आगीत अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या उमेश मुंडाळे यांचे लाखोंचे नुकसान झाले असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
  घडलेल्या या संपूर्ण प्रकाराबाबत गावात तीव्र संतापाची लाट असून याबाबतच्या अनेक घटना या आधी घडलेल्या आहेत या संदर्भात गावातील नागरिकांनी वेळोवेळी मलकापूर शहर पोलीस स्टेशन तथा मलकापूर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला तडीपार करण्याबाबत शासनाने परिपत्रक काढावे अशी मागणी करून देखील त्यावर योग्य कारवाई न झाल्याने आजची ही परिस्थिती उद्भवलेली आहे असे प्रश्नचिन्ह निर्माण केले..
 किमान आता तरी शासनाला जाग यावी व या घडलेल्या सर्व प्रकाराबाबत शासनाने गंभीरतेने विचार करून संबंधित व्यक्तीला तडीपार करावे आणि उमेश मुंडाळे यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाने तात्काळ मदत द्यावी या संदर्भात आज माननीय उपविभागीय अधिकारी साहेब मलकापूर यांना निवेदन देण्यात आले यावेळी जेष्ठ नेते विश्वासरावजी  संबारे,पाडूरंग संबारे ,संभाजी ब्रिगेड चे मलकापूर तालुका अध्यक्ष  राहुल भाऊ संबारे,संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रसिद्धि प्रमुख सुनिल भाऊ बाबुराव संबारे, ग्रामपंचायत  सदस्य इच्छाराम भाऊ संबारे ,विनोद भाऊ इंगळे, सखाराम बिल्लेवार,उमेश मुडाळे, अमोल मुंडाळे,व समस्त गावकरी बेलाड  उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)