शेतकऱ्यांचे अडविलेले रस्ते तात्काळ मोकळे,सां.बा विभागाला रस्त्यातीची मोजणी करून भिंत तोडण्याचे व पाझर तलाव जि.प बाधकाम विभागा मार्फत मोजून तलावात केलेले अतिक्रमण काढण्याचे उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या सुचना
मलकापुर:- तालुक्यातील ग्राम विवरा येथील कल्पा सोलर पाॅवर कंपनीने शेतकऱ्यांचे शेतात जाण्या - येण्यासाठी चे रस्ते अडवून त्यावर सोलर प्लाॅंट उभारला आहे त्या कंपनीचे काम तात्काळ बंद करून रस्ते मोकळे करण्याच्या मागणीसाठी शनिवार शिवसेना (उ.बा.ठा)विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत यांचे सह असंख्य शेतकऱ्यांनी ग्राम विवरा सुरू केलेल्या साखळी उपोषणाची सांगता तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार उगले, एमआयडीसी पो नि. हेमराज कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने सह आदिंनी केली होती त्याच दिवशी दि.16 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी शेतकऱ्यांची व कल्पा सोलर पाॅवर संचालकांची बैठक आयोजित केली होती.
आज बुधवार दि.16 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या दालनात तहसीलदार राहुल तायडे,मंडळ अधिकारी वानखेडे, तलाठी जायभाये, विवरा येथील शेतकरी व कल्पा सोलर पाॅवर कंपनीचे संचालक रोहिदास हिरे, योगेश नागरे, शिवसेना विधानसभा संघटक राजेश सिंह राजपूत, शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर, कामगार सेना शहर प्रमुख हरिदास गणबास, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, किसान सेना शहरप्रमुख सै.वसिम , प्रमोद पाटील, भागवत संबारे, सुरेश चौधरी सह शेतकऱ्यांची बैठक उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी घेतली. यावेळी कल्पा सोलर पाॅवर कंपनीच्या संचालक हिरे व नागरे यांना गट नंबर 216 ब मधून शेतकऱ्यांचे पुर्वीपासुन वहिवाटीचे रस्ते तात्काळ मोकळे करण्याचे तसेच सां.बा विभागाचे अभियंता सचिन तायडे यांना विवरा -तिघ्रा रस्त्याची मोजणी करून अतिक्रमण केलेली ती भिंत काढून टाकण्याचे, पाझर तलाव जि.प बांधकाम विभागाने मोजणी करून पाझर तलावातील अतिक्रमण काढण्याच्या सुचना कल्पा पाॅवरच्या संचालकांना दिले व तोपर्यंत या तिन्ही क्षेत्रातील काम बंद करण्याचे ही मंडळ अधिकारी वानखेडे यांच्यामार्फत कल्पा सोलर पाॅवर सांगितले आहे.
