शिवसेना (उ.बा.ठा) च्या ठेचा-भाकर खाओ आंदोलनाच्या इशाऱ्याच्या धास्तीने वर्षभरापूर्वी तुटलेल्या तिर्थेश्वर महादेव मंदिराच्या 15 पोल उभारणीचे काम सुरू

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

वर्षभरापूर्वी वादळीवाऱ्यासह 15  पोल तुटल्याने मंदिर व परीसरातील शेतकऱ्यांची लाईट होती खंडित 

मलकापुर :- शहरालगत असलेल्या पाचपांडे पेट्रोल पंपा पाठीमागील तिर्थेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या ईले.पोल वर्षभरापूर्वी वादळीवाऱ्यासह 15 पोल तुटल्याने मंदिर परीसर व आजुबाजूच्या परिसरातील दहा - बारा शेतकऱ्यांची लाईट वर्षभरापासून बंद होती.
                  विहिरीत पाणी असतांनाही लाईट नसल्याने डोळ्यासमोर पिकं सुकून जात असल्याने शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती शिवसेना (उ.बा.ठा) शहरप्रमुख गजानन ठोसर यांना दिल्याने शेतकऱ्यांसह ठोसर यांनी म.रा.वि.वि कंपनी कार्यकारी अभियंता राजेश मिश्रा यांची भेट घेतली आठ दिवसांत पोल उभे करून तात्काळ विजपुरवठा सुरू न केल्यास म.रा.वि.वि कंपनी कार्यालयात ठेचा -भाकर खाओ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
     शिवसेना (उ.बा.ठा) च्या ठेचा - भाकर खाओ आंदोलनाच्या इशाऱ्याच्या धास्तीने कार्यकारी अभियंता राजेश मिश्रा, तायडे यांनी जातीने लक्ष घालून आज दि.16 मे रोजी प्रत्यक्षात 15 पोल पाठवून पोल उभारणी चे काम सुरू केले यावेळी शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, किसान सेना शहरप्रमुख सै.वसिम सै.रहिम,रवि बऱ्हाटे,बेटू मधूकर पाटील, रमाकांत पाटील, गुणवंत पोलाखरे,सागर चित्रंग, सुरेश चित्रंग, विजय कवळे सह आदि शेतकऱ्यांची उपस्थिती होती.वर्षभरापासून तुटलेल्या पोल चे काम शिवसेना (उ.बा.ठा) च्या आंदोलनाच्या धास्तीने सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)