मुक्ताईनगर (प्रतिनिधी) ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जळगांव व वक्फ बचाव समिती च्या माध्यमातून "वक्फ बचाव... संविधान बचाव"अभियान अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी "वक्फ कॉडीनेटर समिती चे अब्दुल करीम सालार (कॉडीनेटर) मुफ्ती हारून नदवी(अध्यक्ष), सोहेल अमीर शेख, सुन्नी जमात चे अध्यक्ष सैय्यद अयाज अली, काजी मुजमिल नदवी, अमजद पठाण, साबीर मुस्तुफाबादी, यांची समिती प्रत्येक मस्जिद ला भेट देऊन त्यांचा सोबत "वक्फ बचाव अभियान"बाबत लोकांन मध्ये जनजागृती निर्माण करून संविधानाचे मार्गाने सरकार व कोर्टातून न्याय मागत आहेत,
ह्या वेळी सरकारचे जे धोरण वक्फ बिल बाबत आहे त्यांचा विरोध म्हणून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड चे सेक्रेटरी मौलाना मोहम्मद उमरेन महेमुफज रहेमानी साहेब हे जळगाव येथे येत असून ते वक्फ बिल बाबत सविस्तर पद्धतीने लोकांना मार्गदर्शन व जनजागृती करणार आहे, सदर चे कार्यक्रमाचे आयोजन जळगांव वक्फ बचाव समिती कडून करण्यात येत आहे. त्यात एक भाग म्हणून हे वक्फ बचाव समिती ने मुक्ताईनगर ला पण भेट देऊन त्यांनी प्रत्येक मस्जिद चे मुतवल्ली, सचिव, तसेच ईदगाह, कब्रस्तान, दर्गाह,खाणका, चे पदाधिकारीना निमंत्रण देऊन जळगांव ला होणाऱ्या 5 जुलै 2025 चे कार्यक्रमाचे आमंत्रण दिले आहे व ह्या वेळी वक्फ का काला कानून रद्द करो... रद्द करो... चे घोषणा देण्यात आल्या. ह्या वेळी मुक्ताईनगर वक्फ बचाव समिती चे हकीम चौधरी ( समन्वक) अफसर खान, शकील सर खाटिक, शरीफ बेपारी, हाफिज अमीन, लाल खा, आरिफ आझाद, लुकमान बेपारी, अनिस मणियार, कलीम मणियार (मुतवल्ली मणियार मस्जिद) अहमद ठेकेदार, खुस्तार जनाब, समद खाटीक आदी उपस्थित होते.
