जळगाव जामोद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृहाचा रस्ता डांबरीकरण करावा व हायमास्ट लाईट बसवावे या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्यावतीने बुलंद आवाज उठवण्यात आला. जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी दि. 30 जूनपासून आमरण उपोषण सुरू केले होते. मागील वर्षभर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे टोकाचं पाऊल उचलण्यात आलं होतं.
आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी दि.1 जुलै रोजी प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत मा. तहसीलदार, जळगाव जामोद यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. त्यानुसार, दीड महिन्याच्या आत डांबरी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल आणि तत्काळ पर्यायी व्यवस्था म्हणून खडक टाकून कच्चा रस्ता तयार केला जाईल, असे नमूद करण्यात आले. या लेखी आश्वासनानंतर आमर उपोषणाची सांगता करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडी आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे, दक्षिण जिल्हा अध्यक्ष निलेशभाऊ जाधव, फुले-आंबेडकर विद्वात सभेचे राज्य समन्वयक प्रा.मनोजजी निकाळजे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा विशाखाताई सांवग, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, भारतीय बौद्ध महासभा महिला जिल्हाध्यक्षा छायाताई बांगर, विद्वात सभेचे जिल्हा समन्वयक प्रा.दिलीप कोकाटे, ॲड.रागिणीताई तायडे, मंगलाताई पारवे, गौतम इंगळे, गिरीश उमाळे, नांदुरा तालुकाध्यक्ष आजाबराव वाघोदे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष जगदिश हातेकर, गौतम सुरवाडे, वंचितचे मा.तालुकाध्यक्ष संतोष गवई, बाजार समिती उपसभापती प्रशांत अवसरमोल, रतन नाईक, सुनील बोदडे, देवा दामोदर, विजय सातव, संतोष पवार, राजरत्न वाकोडे, रोशन तायडे, रविंद्र वानखडे, दिलीप दामोदर, विजय दामोदर, प्रशांत नाईक, विकी दामोदर, चेतन तायडे, भास्कर जुबंळे, सुभाष सिरसाठ, सुरेश वाघोदे, मयुर खंडेराव, आदित्य खंडेराव व वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, फुले आंबेडकर विद्वत सभा, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
