दैनिक सेवाशक्ती वृत्तपत्र व सत्यशोधक न्यूज चॅनलचे संपादक शेख कदीर शेख दस्तगीर यांच्यावर तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी कोमल रोडे यांनी अवमानकारक व धमकीचे वर्तन केल्याने संपूर्ण पत्रकार वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
दिनांक २२ जुलै २०२५ रोजी संग्रामपूर तहसील कार्यालयात राशन कार्ड संदर्भातील काही तक्रारी मिळाल्यानंतर पत्रकार शेख कदीर घटनास्थळी पोहोचले.
मात्र वस्तुस्थितीची माहिती घेण्याच्या त्यांच्या अधिकारात अडथळा निर्माण करत कोमल रोडे यांनी अपमानास्पद भाषा वापरत पत्रकारांचा अवमान केला, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
घटनेचे ठळक मुद्दे
कार्डधारक शेख नाझीम यांची कागदपत्रे रागाच्या भरात फेकून देण्यात आली.
पत्रकार घटनास्थळी पोहोचताच त्यांच्यावरच व्हिडीओ चित्रीकरण करून IPC 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली गेली.
पत्रकारांनी मोबाईलद्वारे पुरावे घेत असताना, स्थानिक नागरिकांची मुलाखत घेतल्यावर त्यांना देखील शिवीगाळ व कार्यालयातून हाकलण्याचा प्रयत्न झाला.
कोमल रोडे यांनी तहसीलदारांसमोरही पत्रकारांविषयी द्वेषपूर्ण भूमिका मांडली आणि "परवानगीशिवाय पत्रकार कार्यालयात येऊ नये" असा आक्षेप नोंदवला.
एवढ्यावर न थांबता, पत्रकारांवर खोट्या विनयभंग प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष शेख कदीर यांनी उपविभागीय अधिकारी, जळगाव जामोद यांच्यामार्फत लेखी तक्रार सादर केली असून संबंधित अधिकारी कोमल रोडे यांच्यावर तात्काळ कायदेशीर चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
“जर योग्य ती कारवाई झाली नाही तर राज्यभर पत्रकारांचे कामकाज ठप्प करून तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा पत्रकार परिषदेकडून देण्यात आला आहे.
निवेदन प्रसंगी उपस्थित शेख कदीर भाई
जफर खान, लियाकत खान, उमाताई बोचरे, विनोद चिपडे, नागेश भटकर, अमर तायडे, रवींद्र सिरस्कार विवेक राऊत, समीर खान, सुरवाडे,आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
