केंद्रीय मंत्री मा.श्री हंसराज अहिर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र स्विकारतांना नवनियुक्त म.रा.प्र.युवा उपाध्यक्ष तुषार गार्वे
दीं.२०-७-२०२५ रोजी जालना येथे संपन्न झालेल्या व मोठ्या उत्साहात पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण गवळी समाजाचे सामाजिक आदीवेशन पार पडले यात अनेक समाज हीता साठी झटणाऱ्या युवा तरुणांना समाज सेवा करण्याची संधी देण्यासाठी त्यांची नियुक्ती केली या कार्यक्रमा साठी केंद्रीय मंत्री मा.श्री हंसराज अहिर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते तर गवळी समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.श्री. हिरामण आप्पा गवळी; गवळी समाजाचे महाराष्ट्र युवा प्रदेश अध्यक्ष मा.श्री प्रवीण हुंडीवाले यांच्या नियुक्ती पत्रानुसार व त्यांचे प्रमुख उपस्थितीत किन्होळा येथिल तुषार गार्वे यांना केंद्रीय मंत्री मा.श्री.हंसराज अहिर यांचे हस्ते महाराष्ट्र राज्य प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र राज्यातील अनेक दीग्गज व प्रमुख समाज बांधव कार्यक्रम स्थळी हजर होते श्री तुषार भाउ गार्वे यांच्या नियुक्ती ने समाजातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले त्यांची महाराष्ट्र राज्य गवळी समाज युवा प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांची सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे त्यांची एकमुखी निवड झाल्याने त्यांचे जिल्ह्यासह तालुक्यातील समाज बांधवासह त्यांचे मित्र परिवाराकडून सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे
