विषय: गैबी नगर – मुशर्रफ शाह यांच्या घरापासून ते फिरोज मिस्त्री (मदिना मशीद जवळ) दरम्यान रोडवर चिखल–गारा जमा झाल्याने, साफसफाईसाठी कर्मचारी पाठवण्याबाबत विनंती

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
मुख्याधिकारी महोदय,
नगरपरिषद, नांदुरा
जिल्हा – बुलढाणा
महोदय,
विनम्र विनंती आहे की, गैबी नगर भागातील मुशर्रफ शाह यांच्या घरापासून ते मदिना मशीद जवळ फिरोज मिस्त्री यांच्या घरापर्यंतचा संपूर्ण रस्ता हा सिमेंट काँक्रिट (CC रोड) ने बांधलेला असला तरी, सद्यस्थितीत त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व गारा जमा झालेले आहे.

त्यामुळे परिसरातील नागरिकांना, विशेषतः शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना आणि नमाजासाठी जाणाऱ्या नमाजींना, अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. काही वेळा घसरून पडण्याच्या घटना देखील घडत आहेत.

तरी, कळकळीची विनंती आहे की,

सदर ठिकाणी साफसफाईसाठी तात्काळ दोन कर्मचारी पाठवावेत,

रोडवर साचलेल्या संपूर्ण गाऱ्याचे संकलन करून ते एका ठिकाणी व्यवस्थितरित्या जमा करून घ्यावे,


जेणेकरून नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ मार्ग उपलब्ध होईल.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.

आपला नम्र,
आझाद पठाण
युवा जिल्हाध्यक्ष, समाजवादी पार्टी
रा. गांधी चौक, नांदुरा
मो. 8625892288
दिनांक: १० जुलै २०२५

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)