मलकापूर (ता. २२ जुलै):
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मलकापूर शहराच्या वतीने पारपेठ येथे भव्य आणि लोकाभिमुख रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. अनेकांनी या संधीचा लाभ घेत आपल्या रक्तगटाची तपासणी करून घेतली. युवक, महिलावर्ग, आणि जेष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग या उपक्रमाच्या यशस्वीतेची साक्ष देणारा ठरला.
शिबिराचे उद्घाटन प्रसाद जाधव (जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितींमध्ये बाळू पाटील, राजू डोफे, ॲड. शोएब शेख, बाळासाहेब दामोदर, रफिक खान, राहुल जाधव, अरुण अग्रवाल, राजू साठे, इमरान शेख, संदीपसिंह राजपूत, रवींद्र गव्हाळे इमरान बॉस यांचा समावेश होता.
या उपक्रमामागील प्रमुख संयोजक डल्ला पैलवान यांचे विशेष योगदान राहिले. त्यांनी संपूर्ण नियोजन, जनसंपर्क आणि स्थानिक पातळीवरील समन्वय यामधून हा उपक्रम यशस्वी केला.
यावेळी बोलताना प्रसाद जाधव यांनी सांगितले की,
"राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नेहमीच जनतेच्या हिताचे कार्य करत आली आहे. मा. अजितदादा पवार यांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेऊन अशा सामाजिक उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणे हा आमचा उद्देश आहे."
या उपक्रमामध्ये स्थानिक तरुणांनीही सक्रिय सहभाग घेत जनजागृती व मार्गदर्शनाचे कार्य केले. शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू व्यक्तींना त्यांच्या रक्तगटाची माहिती मिळाली असून, भविष्यात आरोग्याच्या संदर्भात त्याचा लाभ होणार आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम हे पक्षाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरत आहेत.
