जळगाव प्रा. युनुस शेख रशीद यांची ३१ वर्षांनंतर सेवा निवृत्ती

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ द्वारा संचालित कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालय, जळगाव येथील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक प्रा. युनुस शेख रशीद यांनी ३१ वर्षांची यशस्वी सेवा पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयातून सेवानिवृत्ती घेतली.

या सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन महाविद्यालयात अत्यंत सन्मानपूर्वक करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. पी. चौधरी होते. यावेळी प्राचार्या नेमाडे मॅडम, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विधी विभागाचे उप कुलसचिव मुन्नाफ शेख साहेब, उपप्राचार्य सतीश जाधव, प्रा. डॉ. चांद खान (प्रभारी प्राचार्य, इक़रा एच. जे. थीम महाविद्यालय) तसेच युनुस शेख यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

युनुस शेख यांच्या विषयी महाविद्यालयातील शिक्षकांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल, चारित्र्य आणि व्यक्तिमत्वाच्या अनेक गौरवशाली पैलूंविषयी सांगितले. त्यांना एक नीतिमान, कष्टाळू आणि विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे शिक्षक म्हणून गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. कांबळे सर यांनी अत्यंत सुंदर शैलीत केले. त्यानंतर सतीश जाधव सर, डॉ. मुन्नाफ शेख, मुख्तार सर, नेमाडे मॅडम, डॉ. चांद खान आणि डॉ. ए. पी. चौधरी यांनी युनुस सर यांच्याविषयी आपले विचार व्यक्त केले.

यानंतर युनुस सर यांनीही आपले भावना व्यक्त करत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी महाविद्यालय, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि सहकाऱ्यांचेही आभार मानले.

या भावनिक प्रसंगी युनुस सरांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)