मलकापूर – बुलढाणा जिल्ह्यातील भरोसा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना तातडीने शासनाने मदत द्यावी, तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशा मागण्या जिल्हा किसान काँग्रेसतर्फे करण्यात आल्या. यासाठी जिल्हा अध्यक्ष संभाजी शिवाजी शिर्के यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नैसर्गिक आपत्ती, अनियमित पाऊस आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रमुख मागण्यांमध्ये –
1. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने सरसकट कर्जमाफी.
2. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन 2023-24 व 2024-25 या दोन्ही वर्षांच्या पिक विम्याच्या रकमा थेट खात्यात जमा करणे.
3. आत्महत्या केलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी दांपत्याच्या कुटुंबीयांना तातडीने शासन मदत.
4. अतिवृष्टी व गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीचे आर्थिक सहाय्य.
यावेळी प्रदेश सरचिटणीस शेख जबीर शेख बशीर, तुळशीराम नाईक, समाधान आकाळ, समाधान गिते, सिद्धांत इंगळे, अंबादास तायडे, रत्नाकर गायकवाड, शेख अफिरोज शेख आसिफ, शेख फिरोज शेख गनी, विष्णु शिराळ, शशिकांत गव्हाळ, गणेश मोसंबे, सिद्धेश्वर देशमुख, संजय पाटील, भूषण सनीसे, गजानन शेळके, सलीम कुरेशी, प्रकाश इंगळे, कैलास साबळे, मिलिंद पालवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
किसान काँग्रेसने आश्वासन दिले की शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांवर ते भक्कमपणे लढा देत राहतील.
