मलकापूर शहरातील जनसामान्य नागरिकांना भेडसावनार्या समस्येवर त्वरित उपाययोजना करा अन्यथा
By -
अगस्त 13, 2025
0
मलकापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आज दिनांक 13/ 8 /2025 रोजी मलकापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना मलकापूर शहर काँग्रेसच्या वतीने शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पूर्व पुरविणे हे नगरपरिषद प्रशासनाचे कर्तव्य असून गेले अनेक दिवसापासून नागरिकांच्या या समस्या कडे नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत आहे पाणी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शहरातील घाण व कचरा वेळेवर उचलून त्याची विल्हेवाट लावणे नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा नियमित करणे गरजेचे असून जेणेकरून शहरात या घाणीमुळे व अस्वच्छ पाण्यामुळे साथीचे रोग निर्माण होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही त्याकरिता खालील मागण्याची निवेदन शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आले आहे .1) मलकापूर शहरातील प्रत्येक वार्डात नेमून दिलेल्या कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या ह्या दैनंदिन ठरलेल्या वेळेवर पाठवण्यात येऊन शहरातील कचरा साफसफाई करण्यात यावी.2) शहरातील सर्व रस्ते दैनंदिन साफसफाई करण्यात येऊन या रस्त्यातील कचरा उचलण्यात यावा व नालीतील गान नियमित साफ करण्यात यावी शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची तांत्रिक बाबीची तपासणी करण्यात येऊन त्या निकालात काढून शहरात नियमित व वेळेवर स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा.4) मलकापूर शहरातील रस्त्यामध्ये असलेले स्ट्रीट लाईट जे बंद अवस्थेत आहे ते त्वरित दुरुस्त करण्यात यावी.5) मलकापूर शहरात अनेक भागात ज्या ठिकाणी रस्त्यामध्ये मुरूम टाकण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी त्वरित मुरूम टाकण्यात यावा अशी विविध मागणी न.प. मुख्यअधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले मागण्याची पूर्तता दहा दिवसात नाही झाली तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव एडवोकेट हरीशभाऊ रावळ. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी रशीद खान जमादार श्याम कुमार अताउर रहमान जमादार युसूफ खान राजु पाटिल राजेंद्र वाडेकर एडवोकेट मजीद कुरेशी सुहास चौरे तुषार पाटील जावेद कुरेशी अनिल गांधी साजिद खान गिरीश देशमुख ज्ञानदेवरावतायडे सलीम एम एस फिरोज खान सिद्धांत इंगळे राजू ऊखर्डे इजाज शहा सादिक शेख संतोष देशमुख रमेश राजपूत गोपाल तांदुळे हाजी उस्मान मास्टर रितेश देशमुख अनिल तांदूळकर अजगर जमादार गोपाल कवास्कर शेरखान वाजिद खान विजू बाप्पा निर्मल संतोष देशमुख सलीम मलंग कुरेशी श्रीतेज देशमुख शेख नाझीम राजा आयुब शहा राजेंद्र वानखेडे जमील जमादार रउफसेठ बागवान कैलाश ताठे शेख फारुख विलाश सावळे इकबाल खान आदी उपस्थित होते
