बुलढाणा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभेमध्ये शेतकरी कर्जमाफीचा ठराव घ्यावा*- संभाजी शिर्के (किसान काँग्रेस व काँग्रेस अल्पसंख्यांक सेल ची संयुक्त बैठक संपन्न)

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
      बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्के हे जिल्हा दौरा करत असून आज त्या जिल्ह्यात दौरा अंतर्गत मलकापूर येथे किसन काँग्रेस तसेच काँग्रेस अल्पसंख्यांक सेल ची बैठकी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष ऍड. मोहतेशाम रजा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या बैठकीमध्ये प्रमुख मुद्दा म्हणून सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी आपापल्या ग्रामपंचायत मध्ये शेतकरी कर्जमाफीचा ठराव घ्यावा अशी विनंती बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्के यांनी करत या मुद्द्यावर प्रमुख चर्चा करण्यात आली हे ठराव घेण्यासाठी आपण स्वतः सर्व ग्रामपंचायतचे सरपंच तसेच ग्रामसेवकांशी फोनवरून चर्चा  करून हा विषय अजेंड्यावर  घ्यावा ही विनंती करणार आल्याचे त्यांनी सांगितले.
    निवडणुका लागण्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये युती सरकारने निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची आश्वासन दिले होते आता सध्याची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता अत्यंत हलाखीची परिस्थिती शेतकऱ्याची असल्यामुळे हीच कर्जमाफीसाठी योग्य वेळ आहे त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत कर्जमाफी शासनाने शेतकऱ्यांसाठी तात्काळ केली पाहिजे याकरता शासनाला मागणी म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या गावातील ग्रामसभेमध्ये शेतकरी कर्जमाफीचे ठराव घ्यावे या ठरावाची प्रत घेऊन बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी हे सन्माननीय राज्यपालांकडे घेऊन जाणार आहेत व त्यांना कर्जमाफीच्या संदर्भातील विनंती करणार आहेत. तरीही जर यावर कुठलाच ठोस निर्णय घेतला गेला नाही तर हे सर्व कर्जमाफीच्या ठरावांच्या प्रति घेऊन किसान काँग्रेसच्या वतीने कोर्टामध्ये याचिका दाखल केली जाईल. अशा पद्धतीची भूमिका किसान काँग्रेसच्या माध्यमातून भविष्यात समोर राहणार आहे म्हणून सर्व किसान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तसेच शेतकरी वर्गाने या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपापल्या गावातून शेतकरी कर्जमाफीचा ठराव घ्यावा ही विनंती यावेळी करण्यात आली. 
बैठकीनंतर लगेच किसान काँग्रेसच्या काही प्रमुख नियुक्ती सुद्धा करण्यात आल्या.
   या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सोपानराव शेलकर, तालुकाध्यक्ष अनिल भारंबे, शहराध्यक्ष रईस खा  जमदार, राजेंद्र संबारे ,फिरोज खान, ऍड दिलीप बगाडे ,शहजाद खान, अता मास्टर साहेब,राजू जवरे, हनुमान भगत,अतुल खोडके, अशोक मराठे, इजाज मेंबर, आयुब जमदार, शेख नफीस, मोईन कुरेशी,हमीद खान,यांचे सह बैठकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)