अपघाताची माहिती मिळताच शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर रुग्णालयात भेट
मलकापुर:- दसरखेड टोल प्लाजा वरील भानगुरा येथील कर्मचारी संचित सुरेश करहे हा कामकाजातून घराकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जबर जख्मी झाल्याची घटना सायंकाळी सात वाजेदरम्यान घडली. नेहमीप्रमाणे टोल प्लाजा वर ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने उपस्थितांची एकच धांदल उडाली खाजगी वाहनाने सरपंच निना पाटील,अजय मेहेंगे,दिपक चव्हाण, योगेश गाढे, सह उपस्थितांनी जख्मी संचित करहे यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.अपघाताची माहिती मिळताबरोबर शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शहरप्रमुख हरीदास गणबास, किसानसेना शहरप्रमुख सै.वसीम सह पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.संचित याचे डोक्याला जबर मार असल्याने त्यास खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.
दसरखेड येथील टोल नाक्यावर ॲम्बुलन्स,क्रेन उपस्थित राहत नसून ती बेलाड फाट्यावरील टोलच्या कार्यालयात उभी असून तिचा चालक हा बाहेरगावी राहत असल्याने टोल वरील वाहनधारकांना अपघाता वेळी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने उद्यापासून टोलवर ॲम्बुलन्स, क्रेन चालकांसह (हजर) उपस्थित न ठेवल्यास शिवसेना (उबाठा) त्या ॲम्बुलन्स,क्रेन ची महाआरती ओवाळणी कार्यक्रम करणार असल्याचा इशारा शिवसेना जिल्हा उपप्रमुख गजानन ठोसर यांनी टोल मॅनेजर यांना भ्रमणध्वनी द्वारे दिला आहे.
