मलकापूर. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सतत लढा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा पदनियुक्ती जाहीर करण्यात आली. या नियुक्तीत बाळू ठाकरे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, तर गोपाल सातव यांची मलकापूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या पदनियुक्तीमुळे संघटनेला नवचैतन्य मिळणार असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिक जोमाने काम करण्यास गती मिळेल, असा विश्वास या वेळी जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी व्यक्त केला.
बाळू ठाकरे आणि गोपाल सातव यांच्या नियुक्तीचा शेतकरी बांधवांनी आनंद व्यक्त केला असून, त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेचे ध्येय-धोरण गावोगावी पोहोचवून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.
