संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले,मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करणार:- जिल्हाध्यक्ष अमर पाटील

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापुर 
मलकापुर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड.शिवश्री मनोज आखरे यांच्या आदेशानुसार १८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी,रखडलेला पीक विमा कुठल्याही अटी शर्ती विना देणे,राज्यात अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये प्रमाणे सरसकट नुकसानभरपाई द्या.मराठा,धनगर व इतर समाज बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवून जातीय तेढ रोखणे,भेसळयुक्त दुधाला आळा घालून शेतकऱ्यांना ७० रुपये प्रति लिटर भाव द्या,उसाला एफ.आर.पी. प्रमाणे भाव देऊन ७ दिवसात त्याचे पूर्ण पैसे शेतकऱ्याला मिळावे.कांदा,कापूस,सोयाबीन, धान व इतर शेत मालाला हमीभाव जाहीर करा.ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या यांसह इतर मागण्यांचे पत्र जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले होते.पण मागण्या मान्य न झाल्यामुळे आज २१ ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेडचे बुलढाणा जिलाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडे वाजवत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकारी यांना आक्रमक आंदोलनाची भूमिका सांगत सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर संभाजी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या आवाजाने दणाणला.यावेळी पक्षाचे वरिष्ठ राज्य पदाधिकारी म्हणून प्रदेश संघटक योगेश पाटील,जिलाध्यक्ष अमर रमेश पाटील,जिल्हा उपाध्यक्ष चेतन धुमाळ,जिल्हा सचिव मंगेश सोळंके,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनील सांबरे,जिल्हा संघटक संजय ससाणे,जिल्हा संघटक कुलदीप डंबेलकर,जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे,नांदुरा तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे,तालुका उपाध्यक्ष भगीरथ मनस्कार,मलकापूर तालुकाध्यक्ष राहुल संबारे,तालुका उप अध्यक्ष श्रीकृष्ण गावंडे, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र ढगे, तालुका कार्याध्यक्ष माधव रत्नपारखी, शंकर संबारे,संतोष संबारे,गजानन संबारे,निलेश सोनोन,,सुरेश साठे,संजय बाठे,राहुल मापारी,अरविंद बाठे,अमोल भगत,गोपाळ देवकर,सोपान पाटील,भगवान ढोले,गणेश तायडे,सुमेध इंगळे,गणेश दही,अमोल सावरकर,रवींद्रनाथ मडीवाल,रामेश्वर मडीवाल,शंकर संबारे व इतर बहुसंख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)