पुलाची तात्काळ दुरुस्ती न केल्यास जि.प बांधकाम विभागाचे कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा
मलकापुर:- तालुक्यातील लासुरा-मेंढळी रस्त्यावरील विश्ववगंगा नदीवरील पूल वाहून गेल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना जिव धोक्यात घालून नदी पात्रातून शेतात ये-जा करावी लागत असल्याने या पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा जि.प बांधकाम विभागाचे कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात असा इशारा एका निवेदनाद्वारे जि.प बांधकाम विभाग अभियंता सोळंके यांना देण्यात आला आहे निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शहर प्रमुख हरिदास गणबास, उपशहर प्रमुख शकील जमादार, किसानसेना शहर प्रमुख सै. वसीम सै. रहीम, वाहतूकसेना शहर प्रमुख इमरान लकी, विभाग प्रमुख चांद चव्हाण, शेख फरहान, जावेदखान, शेख मोहसीन शेख छोटू, पुरुषोत्तम काशीराम अढाव, रमेश शेषराव अढाव, रामपाल भिकूसिंग राजपूत, शंकर बगाडे, भास्कर नागो बगाडे, जितेंद्र शांताराम पारस्कर सह आदींच्या स्वाक्षऱ्या नमूद आहेत.
