शिवसेना (उबाठा) चे आंदोलनाच्या धास्तीने सां.बा विभागाने कापली बुलढाणा रोडवरील जीवघेणी वाळलेली निबांची झाडे

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

  
मलकापुर :- शहरातील मुख्य रहदारीच्या बुलढाणा रोडवरील जनता कॉलेजच्या  प्रवेशद्वारावरील तसेच पंचमुखी हनुमान मंदिराजवळील दोन निंबाची झाडे वाळली, सद्या पावसाळ्याचे,वारा-उधाणाचे दिवस असून या मार्गावर शाळा, काॅलेज असून विद्यार्थ्यांसह, रहदारीचा रस्ता असल्याने ही झाडे कोसळून जिवितहानी होवू नये यासाठी गेल्या सहा महिन्यापासून याबाबतच्या तक्रारी केल्या मात्र  सां.बा विभाग कुंभकर्णी झोपेत असून अद्यापही ती झाडे तोडत नसल्याने दि.18 जुलै रोजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी सां.बा विभाग बुलढाणा कार्यकारी अभियंता जे.जे. ऐकडे यांना भ्रमणध्वनीवरून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही जीवघेणी झाडे तोडा अन्यथा शिवसेना ती झाडे कापून नेणार असल्याचा इशारा ऐकडे यांना भ्रमणध्वनीवरून दिला होता शिवसेना (उबाठा) च्या आंदोलनाच्या धास्तीने पंचमुखी हनुमान मंदिराजवळील वाळलेले निंबाचे झाडं त्याच दिवशी सायंकाळी तोडणयात आले तर जनता काॅलेज प्रवेशद्वारावरील वाळलेल्या निंबाच्या झाडामधून 33 के.व्ही विद्युत तारा गेल्या असल्याने म.रा.वि.वि कंपनी ची परवानगी घेवून मेन विद्युत पुरवठा बंद करुन दि.02 ऑगस्ट 25 रविवार रोजी वाळलेल्या जनता काॅलेज प्रवेशद्वारावरील दुसरे निंबाचे झाडं कापण्यात आल्याने मलकापुर वासियांनी सुटकेचा श्वास  शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, किसानसेना शहरप्रमुख सै.वसीम सै.रहीम, संजय बुडूकले,वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी,विभाग प्रमुख चांद चव्हाण, शेख फरहान, जावेद खान शेख मोहसीन शेख छोटू, पुरुषोत्तम काशीराम अढाव सह शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)