अवघ्या काही दिवसांवरच गणेशोत्सवाची चाहूल सर्वांना लागली आहे गणरायाचे स्वागत करण्याकरिता भाविक उत्साहात तयारीला लागले आहे
गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते स्वागत साठी तयारीला लागले आहेत त्याचप्रमाणे वर्गणी गोळा करण्याला देखील सुरुवात झाली आहे
घरातील चिमुकली मंडळी देखील गणपतीच्या आगमनासाठी साठी मातीचे गणपती लहान लहान किल्ले तसेच वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करण्याकरिता गुंतलेले आहेत
चिमुकले तसेच मूर्तिकार यांचेही मूर्ती घडविण्यासाठी काम सुरू आहे
मूर्तिकार यांचे मूर्ती घडविण्याचे कार्य हे शेवटच्या टप्प्यात असून लवकरच बाप्पा चे आगमन होणार आहे
गणेश मूर्ती बनवण्याचे काम गेल्या दीड दोन महिन्यापासून सुरू आहे
बहुतांश गणेश मूर्ती तयार होऊन बाजार मध्ये उपलब्ध देखील झाल्या आहेत.
मूर्तिकारांचे यामध्ये विशिष्ट असे गुण पाहायला मिळत आहेत
वेगवेगळ्या स्वरूपाचे मूर्ती घडविण्यात मूर्तीकरांचे नैपून्य दिसून येत आहे
27 ऑगस्ट रोजी होणाऱ्या गणपतीच्या आगमनासाठी सजावट सामग्री मंडप साऊंड सिस्टिम आदींची बुकिंग ला देखील सुरुवात झाली आहे अवघ्या काही दिवसातच गणरायांचे आगमन होणार असून यामध्ये मूर्ती कलाकारांची रंगरंगोटी शेवटच्या टप्प्यात सुरू आहे
मूर्तिकारांचे काम रात्रंदिवस सुरू आहे.
