मलकापुर:-शहरातील नागरीकांचे, विद्यार्थ्यांचे शासकीय कामासाठी उपयुक्त असणारे जन्म -मृत्यू चे जवळपास दिड ते दोन हजार आदेश संबंधितांनी कागदपत्राची पूर्तता करून,नोटरी करीत वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन दिड ते दोन हजार रुपये खर्च करून गेल्या वर्षभरापासून तहसील कार्यालयात धूळ खात पडून आहे.वर्षभरापासून, विद्यार्थी ,नागरिक या दाखल्यांसाठी तहसील कार्यालय चकरा मारुन मानसिक शारीरिक व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने याबाबतची माहिती संबंधितांनी शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना दिल्याने आज शिवसेना(उबाठा) पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार राहुल तायडे यांना निवेदन देत प्रलंबित आदेश तात्काळ पारीत करण्याची मागणी केली आहे.अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, किसानसेना शहरप्रमुख सै.वसीम सै.रहीम, युवा सेना शहरप्रमुख मंगेश सातव,किसन पाटील, किशोर राऊत, विभागप्रमुख सत्तार शाह, अनिल श्रीखंडे, शेख मोहसीन शेख छोटू,ईमामभाई,शेख ऐजाज शेख बुढन,युसूफ खान आझाद खान, नावेदखान मुसाखान, अब्दुल जमील अब्दुल कदीर,शेख आसिफ ईसाकखान, मोहम्मद इक्बाल ,शेख जावेद सह शिवसेना पदाधिकाऱ्याच्या स्वाक्षऱ्या नमूद आहे.
