Mcn न्यूज मराठी वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा...पुराव्या आधारे बातमी लावणारे चॅनल म्हणजेच mcn न्यूज ... आमदार संजय कुटेराज्यभरातील mcn न्युजच्या पत्रकारांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

एमसीएन न्यूज मराठी या न्यूज चॅनलचा बारावा वर्धापन दिवस 30 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद शहरातील सांस्कृतिक भावनांमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.... 
यावेळी राज्यभरातील mcn न्युज मराठीच्या विविध जिल्ह्याचे पत्रकार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.... 
माजी कॅबिनेट मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.... तर यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रसेंजित पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा संपर्कप्रमुख रंगराव देशमुख, बुलढाणा अर्बनचे उपाध्यक्ष डॉक्टर किशोर केला, वंचित बहुजन आघाडीचे एडवोकेट संदीप उगले, जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निश्चळ, जळगाव जामोद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीपकुमार मोरे, जळगाव नगरपालिका मुख्याधिकारी सुरज जाधव, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी,  तसेच बुलढाणा तालुका कृषी अधिकारी अजय वाढे, सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता  निलेश भेलके यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.... प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनानंतर या वर्धापन दिन सोहळ्याचा शुभारंभ झाला... याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी एमसीएन न्यूज चॅनलचे कौतुक करून चॅनलसाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांची प्रशंसा केली.... चॅनलवर प्रसारित झालेल्या विविध बातम्यांचा आढावा घेऊन आमदार कुटे यांनी एमसीएन न्यूज मराठी कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय बातम्यांचे प्रसारण करीत नसल्याची माहिती व्यासपीठावरून बोलताना दिली...

बाईट १ आमदार --

 तर जळगाव जामोद सारख्या छोट्याशा शहरातून सुरू झालेल्या एनसीएन न्यूज मराठीच्या वाटचालीसाठी सर्व पत्रकारांना उपस्थित मान्यवरांनी मन भरून शुभेच्छा दिल्या.... 
या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त एमसीएन न्यूज मराठी साठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला...
याप्रसंगी विविध मान्यवरांसोबतच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले....
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भगत तर प्रास्ताविक  एमसीएन न्यूज मराठीचे संपादक राजीव वाढे यांनी केले... या वर्धापन दिन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांसह पत्रकार बांधवांचे आभार न्यूज चॅनलचे मुख्य संपादक शामकुमार तायडे यांनी मानले....
. स्नेहा भोजनानंतर या वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाची सांगता झाली..

पाहूया या कार्यक्रमातील मान्यवर तसेच इतर प्रतिक्रिया ...

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)