वडजी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शाखा उद्घाटन व शेतकरी मेळावा संपन.

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 



मलकापूर : वडजी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शाखा उद्घाटन व शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले होते. जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.


मेळाव्यात शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्जमुक्त सातबारा, पिक विमा, १८,५०० रुपयांचे दुष्काळी अनुदान, तसेच पिकांना हमीभाव न मिळाल्याबाबत वक्त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. उपस्थित शेतकऱ्यांना एकत्र येऊन संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले म्हणाले की, “फडणवीस साहेबांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, पण आजवर ते पूर्ण केले नाही. १८,५०० रुपयांचे दुष्काळी अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. सोयाबीन, कापूस, तूर आणि मका या पिकांना हमीभाव नाही. सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे.”


जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनीही सरकारवर टीका करताना म्हटले की, “शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहे. पण फडणवीस आणि अजित पवार केवळ सत्तेचे सोंग करत आहेत. महाराष्ट्रात बोगस बियाण्यांचा हैदोस माजला असतानाही सरकार नगरपालिकेच्या निवडणुकीच्या गणितात गुंतलेले आहे. मायबाप सरकार शेतकऱ्यांच्या अश्रूंना उत्तर देणार का?” या मेळाव्यात शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखणे, चळवळ अधिक प्रभावी बनविणे आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरू ठेवण्याचे ठरविण्यात आले. या कार्यक्रमास सौ. ममता ताई राजपूत (सरपंच, वडजी), प्रकाश नारखेडे, गणेश राजपूत, गणेश खाचणे, नीना खाचणे, माजी सरपंच ज्ञानदेव खाचणे, शाखा अध्यक्ष पराग बोंडे, उपाध्यक्ष योगेश राजपूत, सचिव नंदलाल तायडे, कोषाध्यक्ष प्रवीण भारंबे, सहसचिव अनंता खर्चे आदी मान्यवर उपस्थित होते.मेळाव्याचे सूत्रसंचालन योगेश भारंबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पराग बोंडे यांनी मानले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)