अल्पसंख्यांक हक्क दिन – 18 डिसेंबर

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


18 डिसेंबर हा अल्पसंख्यांक हक्क दिन देशभरात महत्त्वाने पाळला जातो. या पार्श्वभूमीवर अड. वसीम कुरेशी – मार्टी कृती समिती यांनी शासन व स्थानिक प्रशासनाला विशेष आवाहन करताना म्हटले की, अल्पसंख्यांक बांधवांच्या हक्कांचे रक्षण, त्यांच्या समस्यांची दखल आणि शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा दिवस औपचारिकपणे व प्रभावीपणे साजरा करण्यात यावा.

याच दिवशी अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या शिक्षण, उद्योजकता, आरोग्य व आर्थिक सहाय्याच्या योजनांची जनजागृती मोहीम राबविणे, माहिती शिबिरे घेणे आणि अधिकृत पातळीवर विशेष कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“अल्पसंख्यांक हक्क दिन केवळ औपचारिक नसून, समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी या दिवसाचे महत्त्व प्रत्यक्षात उतरले पाहिजे,” असे आवाहन करत अड. वसीम कुरेशी यांनी शासनाला सक्रिय भूमिका घेण्याची मागणी केली.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)