धनगर डीपी संदर्भात दोन दिवसांपासून घिर्णी - बेलाड येथील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर
मलकापूर तालुक्यातील दोन गावातील गावकरी एका डीपी साठी एकत्र, सविस्तर माहिती अशी की आधी हंगामामध्ये पावसाने शेतकऱ्याच्या आशेवर पाणी फिरवले त्यामुळे शेतकरी हातबल झालेला आहे आणि रब्बी हंगामामध्ये त्याच्या आशेला अंकुर फुटलेले आहे परंतु अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये मका, हरभरा आणि गहू सह इतर रब्बी पिकाची पेरणी केलेले आहे परंतु मोटर चालू करण्यासाठी शेतकरी जसा बटन दाबतो तशी लाईट प्रचारामध्ये उमेदवार जसा प्रचार करतो तशी येते आणि चालली जाते आणि मग सुरू होतो लाईटचा लपंडा याच कारणामुळे शेतकरी मानसिक त्रासाने कंटाळवा झाला आहे आधीच हतबल झालेला शेतकरी आता अशा परिस्थितीला सामोरे जात असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाची व लोकप्रतिनिधी साथ हवी असते मात्र संकटांमध्येच दोन्ही यंत्रणा शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडतात याच कारणामुळे घिर्णी - बेलाड गावातील अनेक शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे व स्थानिक प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध सुद्धा नोंदवला आहे आज या उपोषण स्थळाला शेतकरी संघटनेचे नेते मंडळींनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे पत्रकार रविंद्र गव्हाळे यांनी सुद्धा ग्रामीण पत्रकारांच्या वतीने उपोषणाला पाठिंबा देत शासनाचा व लोकप्रतिनिधींचा तीव्र शब्दात निषेध केला.
