नागपूर येथे दिनांक 23 मार्च रोजी संविधान चौक मधून विशाल जन आक्रोश मोर्चा काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी आणि मित्रपक्ष मिळून काढण्यात आला.

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0



  तत्पूर्वी संविधान चौकामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे दर्शन मा बाळासाहेब आंबेडकर व मा हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतले. त्यानंतर संविधानेच्या प्रथमेच पूजन त्याने केलं.  या चौकामध्ये उभारलेल्या स्टेज समोर हजारोच्या संख्येने जनता उपस्थित होती. यावेळी प्रामुख्याने मा हर्षवर्धन सपकाळ व मा बाळासाहेब आंबेडकर मा सुजिद आंबेडकर यांची भाषणे अत्यंत जोरदार झाली. हा मोर्चा देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी हे हा देश अमेरिकेचे पंतप्रधान ट्रम्प व इसराइलच्या नादी लागून व त्यांचे ऐकून भारताला बरबाद करीत आहेत. त्याच्या सूचनेचे पालन करून  भारताचा अपमान करीत आहे. इराण हा पारंपारिक भारताचा मित्र असून सुद्धा इराणवर झालेल्या हल्ल्यातील घटनेबाबत एक  शब्दही पंतप्रधान बोलत नाही. हा देश जर वाचवायचा असेल तर मोदी पंतप्रधान नको त्यांना बरखास्त करा अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली. तसेच  आरएसएस चे प्रमुखांनी मोदीचा राजीनामा घेण्यासाठी म्हणून या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते. 

यावेळी मा साजिद पठाण मा सुभाष ठाकरे व इतर नेत्यांची भाषणे झाली. पोलिसांनी हा मोर्चा जवळच असलेल्या झिरो माइल येथे अडवला. तिथे सुद्धा जोरदार निदर्शने व भाषणे झाले व मोर्चा तिथेच संपला. 

       यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून प्रामुख्याने मा लक्ष्मण दादा घुमरे मा देवानंद पवार मा दत्ता काकास मा भाई प्रदीप अंभोरे मा राजाभाऊ गायकवाड इत्यादीनी सहभाग घेतला.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)