मलकापूर- आज दि.10 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता भाजपा च्या जनसंपर्क कार्यालयात (भारत कला रोड वर ) मा.आ.चैनसुखजी संचेती यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद चे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण उपस्थित राहावे नम्र विनंती...

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0



मलकापूर:- परिसरात मोठे उद्योग आणून बेरोजगांरांना रोजगार देणे हे खऱ्या अर्थी राज्यकर्त्यांचे कर्तव्य असते. परंतू सद्यस्थितीत लोकप्रतिनीधी व विधीतज्ञ मिळून बेंझो सारख्या उद्योगासमोर अडचणी निर्माण करीत आहेत. या अडचणीतून आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून न्यायालयीन प्रक्रियेकरीता ठरावीक रक्कम गोळा केल्या जात आहे. अर्थात शेतकऱ्यांच्या आड कंपनीला बदनाम करणे व कामगारांना बेरोजगार करणे. असा चुकीचा प्रकार होत असून हा प्रकार आम्ही मुळीच खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपा नेते चैनसुख संचेती यांनी दिला.

दसरखेड एम.आय.डी.सी. परिक्षेत्रातील बेंझो केमीकल्स कंपनी विरुध्द शेतकरी वर्गाला भडकविल्या जात आहे. त्यातुन कंपनी समोर अनंत अडचणी निर्माण केल्या जात आहे. परिणामतः सदर कंपनी दुसरीकडे स्थलांतरीत झाल्यास कामगारांचे काय होणार हा प्रश्न प्रत्येकाला सतावत असून बेरोजगारीचे संकट ओढावल्यास परिवाराचा गाडा कसा ओढाव अशी भिती व चिंता कामगारांना सातत्याने सतावत होती. त्यातच शेतकऱ्यांचे कसलेही नुकसान झाले नसल्याची बाब दस्तुरखुद्द शेतकऱ्यांनीच समोर करीत कंपनी वाचुन कामगारांना न्याय मिळावा या भुमीकेतून भाजपा नेते चैनसुख संचेती यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. या बाबीला गांभीर्याने घेत आज दि. १० ऑक्टोंबर रोजी स्थानिक भाजपा कार्यालयात पत्रकार परिशद आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाजपाचे शिवचंद्र तायडे, संजय काजळे पाटील, माधवराव गावंडे, शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे, विलासराव पाटील, साहेबराव पाटील, भगवान पाटील, शंकरराव पाटील, अमृत बोंबटकार आदी मंडळींसमवेत दसरखेड परिसरातील शे तकरी बांधव कंपनीतील अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान मलकापूरातील तथाकथीत नेते व स्थानिक आमदार यांनी सवंग लोकप्रियेतेकरीता सरळसरळ गोरगरीब शेतकऱ्यांची दिशाभूल चालविली आहे. बेंझो केमीकल कंपनीला हरीत लवादाने प्रतिवर्श २५ कोटी या प्रमाणे मागील १० वर्षाच्या पर्यावरण ऱ्हासासाठी २५० कोटी दंड ठोठाविल्याचे सांगितल्या जात आहेत. वास्तविक पाहता सदर अर्ज क्र. २९९/२०१७ या प्रकरणातील दि. २९ ऑगस्ट २०२२ च्या निकालात परिच्छेद क्र. १५ मध्ये प्रतिवर्श २५ कोटी असे कोठेही नमूद केलेले नसून एकूण दंड २५ कोटी असे म्हटलेले आहे. एवढी साधी सोपी बाब स्वतः विधीतज्ञ नेत्यास समजू नये का ? ही सुध्दा आश्चर्याची बाब आहे. ह्या मागे काही स्वार्थी व्यवसायीक गणित तर नाही ना ? असा स्पष्ट  संशय निर्माण होत आहे. २५ कोटी दंड झालेला असतांना २५० कोटी दंड झाला आहे, हे सांगण्यामागचे नेमके कारण तरी काय याचाही खुलासा होणे गरजेचे झाले आहे. गोरगरीब शेतकऱ्यांकडून न्यायालयीन खर्चापोटी ठरावीक रकमेची मागणी करणे ही बाब कितपत माणुसकीचे लक्षण आहे ? सदर चे प्रकर हरीत लवादात सुरु असतांना अनेकांनी पडद्यामागे गुपचूपपणे सदर कंपनीसोबत हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला. अशी  हातमिळवणी करुन मलीदा लाटणाऱ्या  टोळक्यांची कर्मकृत्ये जनतेने या पुर्वीही अनुभवली आहेत. ठरावीक अर्जदारांना त्यांच्या हातावर ४० हजार टिकवून त्यांना कंपनीविरुध्द केलेला अर्ज मागे घेण्याचा सल्ला देणाऱ्यांना गोरगरीब जनतेसमोर उघडे करण्याची आता खऱ्या अर्थी वेळ आलेली आहे. एकीकडे सुरु असलेल्या प्रकाराला शेतकऱ्यांचा लढा म्हणायचे अन् दुसरीकडे त्यांचीच दिशा भूल करुन पैसा कमवायचा हाच यांचा धंदा झाला आहे की काय ? यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटते की नाही ? असा सवाल उपस्थित करीत दूरदृष्टी नसलेल्या स्वार्थी व अपरिपक्व नेत्यांमुळे मलकापूर विधानसभा मतदार संघ भकास होण्याच्या मार्गावर असल्याबाबतही भाजपा नेत संचेती यांनी चिंता व्यक्त केली. स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता जनतेच्या जिवावर उठलेल्या या तथाकथीत नेत्यांना आता चांगला धडा शिकविणे गरजेचे झालेले असून अशा नेत्यांना परिसरातील शेतकरी व कामगार धडा शिकविल्याशिवाय निश्चितच स्वस्थ बसणार नाही असा विश्वास देखील भाजपा नेते चैनसुख संचेती यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तर महत्वाचे म्हणजे ज्या कामगारांनी कंपनीच्या भरवश्यावर विविध अत्यावश्यक कामांकरीता कर्ज घेतले आहे त्यांनी कंपनी स्थलांतरीत झाल्यास कर्ज कसे फेडावे हा प्रश्न त्यांना सतावत आहे. कंपनी दुसरीकडे स्थलांतरीत झाल्यास १ हजार कामगारांवर अवलंबून असणाऱ्या त्यांच्या परिवारातील ५ हजार पेक्षा अधिक लोकांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे या कामगारांवरसुध्दा अन्याय होता कामा नये ही ठोस भुमीका भाजपा नेते चैनसुख संचेती यांनी घेतली.


चौकट :-

या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कामगारांनी लोकप्रतिनिधी व विधीतज्ञाच्या कार्यावर संशय व्यक्त करीत संतप्त प्रतिक्रीया दिल्या. त्याच प्रमाणे परिसरातील शेतकऱ्यांनी आमच्या शेती याच परिसरात असून आमचे शेतीचे कसलेही नुकसान झाले नाही अथवा उत्पादन क्षमतेतही घट निर्माण झाल्याचे दिसून आले नाही. महत्वाचे म्हणजे सदरहू शेतांमध्ये विहीरी असून याच विहीरीचे पाणी बागायती करीता व पिण्याकरीता  वापरल्या जात असून आम्हाला त्याचा कसलाही त्रास झाला नसल्याची बाबही शेतकऱ्यांनी ठासून सांगितली.


मागील काही दिवसात दसरखेड एम.आय.डी.सी. परिसरात तज्ञ वैज्ञानिकांची चमू येवून बेंझो कंपनीच्या पाण्याची व परिसरातील शेतातील पिकांची तपासणी करुन गेले. दरम्यान त्यांनी पाण्याचा अहवाल देत या भागात कंपनीच्या पाण्यामुळे कोणत्याही शेतातील पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अहवालसुध्दा सादर केला. त्याच प्रमाणे १० वर्षातील प्रशासकिय आणेवारी पाहता नैसर्गिकरित्यासुध्दा पिकांचे नुकसान झाले नसल्याची बाब स्पष्ट होते. त्यामुळे परिसरातील विहीरीचे पाणी दुषीत झालेले नसून कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले नाही हे तज्ञ वैज्ञानिकांनी दिलेला अहवाल व आणेवारी अहवालावरुन सिध्द होते असे मत भाजपा नेते चैनसुख संचेती यांनी सदर अहवाल पत्रकारांना दाखवित वास्तव परिस्थीतीचे स्पष्टिकरण दिले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)