मागील तीन ते चार दिवसापासून लिकेज वॉल मधून मोठ्या प्रमाणात पिण्याचा पाण्याची नासाडी होत असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे
गांभीर्याची बाब म्हणजे सदर ठिकाणी लिकेज मधून सतत पाणी वाहत असल्यामुळे त्या ठिकाणी डबके साचलेले असून
त्या डबक्यामध्ये गावातील मुक्त संचार असलेले प्राणी डुकरे व कुत्रे व इतर प्राणी लोळत असून तेच दूषित पाणी नागरिकांना पिण्यासाठी सोडण्यात येत आहे
त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची व गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही
सध्या उन्हाळा सुरू असून सर्वत्र पिण्याच्या पाण्याची वनवन सुरू असून तलाव विहिरी यांची पाण्याची पातळी कमी झालेली आहे उन्हाची दाहकता वाढलेली असून 42 ते 44 dc पर्यंत तापमानमध्ये वाढ होत असून थंड शीतपेय व पाण्याची शरीराला गरज असते
ग्रामपचायतीला पाण्याच्या महत्त्वाचे विसर पडलेला दिसत आहे पाणी आडवा पाणी जिरवा
थेंब थेंब तडे साचे या म्हणीचा येते प्रतेय येथे येतो
पूर्वीच गावात 15 ते 20 दिवसानंतर गावातील नागरिकांना पिण्यासाठी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे
केंद्र व राज्य शासनाद्वारे विशेषता ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून तसेच विविध योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली वनवन थांबवण्यासाठी
गावातील वृद्ध व अबाल महिला यांची पाण्यासाठी होत असलेले पायपिसाळ व भटकंती होऊ नये म्हणून वेळेवर पाणी पुरवठा तसेच योग्य उपाय योजना करणे हे ग्रामपंचायतचे मुख्य दायित्व असते
यांचा जणू ग्रामपंचायतला विसर पडल्याचे दिसत आहे
सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर पाईपलाईन व लिकेज वाल दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी गावातील जागरूक व सज्ञ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे
