बोगस नोंदणी केलेली आणखी तीन वाहने जप्तआतापर्यंत १५ वाहने केली पोलिसांनी जप्त

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0



  बुलढाणा : बोगसपणे नोंदणी केलेली आणखी तीन वाहने पोलिसांनी १२ ऑक्टोबर रोजी जप्त केली आहेत. आतापर्यंत बुलडाणा शहर पोलिसांनी या प्रकरणात १५ वाहने जप्त केली असून, १७ वाहनांचा कसून शोध घेण्यात येत आहे


बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ३४ वाहनांची बोगसपणे नोंदणी करण्यात आली होती. कारला ट्रॅक्टरचे राखीव क्रमांक दिल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले होते.


या प्रकरणाचा तपास बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील करीत आहेत. १२ ऑक्टोबर रोजी आणखी तीन पोलिसांनी जप्त केले आहेत. यामध्ये शिवना येथून दोन आणि जालना येथील एका वाहनाचा समावेश आहे. ही वाहने नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अर्शदकडून विक्री करण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी अनेक वाहन मालक आणि मध्यस्थांचा जबाब नोंदवला आहे. पोलिसांच्या चौकशीत अनेक बाबींचा खुलासा होत आहे.


चौकट


चोरीच्या वाहनाची बुलडाण्यात नोंद


मुंबई येथील चोरी गेलेल्या तवेरा वाहनाची बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हे वाहन मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या वाहनाची नंबर प्लेट पोलीस जप्त करणार आहेत. १७ वाहनांचा बुलडाणा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येणार आहे. नागपूर, अमरावती आणि सावनेर येथील वाहनांचाही ३४ वाहनांमध्ये समावेश आहे. त्यामुळे पोलीस तेथील वाहन मालकांचीही चौकशी करणार असल्याचे समजते

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)