आनंदाच्या शिध्यातील गोडवाच गायब ! चोरवड येथील प्रकार, साखरेचा पुरवठाच केला नाही, दिवाळीनंतर उर्वरित माल येणार

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
भुसावळ (प्रतिनिधि) जुबेर मन्यार

चोरवड ता. भुसावळ : महाराष्ट्रातील जनतेची दिवाळी गोड व्हावी, म्हणून १०० रुपयांत आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. परंतु चोरवड  येथे मात्र त्यातील गोडवाच शासनाने दिला नाही. या आनंदाच्या शिध्यात चणाडाळ, रवा व तेल दिले. साखर मात्र गायब आहे. मात्र लाभार्थ्याकडून 80 रुपये घेतले जात होते.

गरीब जनतेचीही दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून १०० रुपयांत एक किलो चणाडाळ, एक किलो साखर, एक किलो रवा व एक लिटर तेल असे किट करण्यात येत आहे. येथे मात्र गरिबांचा आहे. साखरच मिळाली नाही  चोरवड स्वस्त धान्य दुकानात मिळालेला अपूर्ण आनंदाचा शिधा.

सर्वत्र स्वस्त धान्य दुकानातून वाटप शिध्यातील गोडवाच हिरवला आहे. गोडवाच म्हणजे साखरच गायब झाली कसा होणार आनंदाच्या शिध्यात शासनाकडून चार किलो अन्नाच्या वाटपाचे आश्वासन असताना पूर्ण किट न देता दिवाळीतील कुठे दोन किलो तर कुठे तीन किलोचे किट उपलब्ध होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या अपूर्ण आनंदाच्या शिध्यामुळे गोडवाच हिरावल्यासारखे झाला आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)