नांदुरा तालुक्यातील मौजे वडनेर भोलजी येथील गट क्रमांक 257 आठवडी बाजार ओट्यावरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात येऊन या ठिकाणी पूर्वीप्रमाणे रीतसर आठवडी बाजार भरविण्यात यावा अशी मागणी गावकरी नागरिकांनी तथा माजी सरपंच श्री जीवनसिंग शितल सिंह देशमुख श्री ओंकार पांडे मा. हाफिज खान हबीब खान या तिन्ही माजी उपसरपंचांनी रीतसर जिल्हाधिकारी बुलढाणा उपविभागीय अधिकारी मलकापूर आणि ग्रामपंचायत कार्यालय वडनेर भोलजी ला तक्रार अर्ज दाखल केला असून गट नंबर 257 आठवडी बाजार 40 आर या क्षेत्रफळाची तात्काळ मोजणी होऊन गावाच्या हितावह या ठिकाणी आठवडी बाजार भरविण्यात यावा अशी मागणी केलेली आहे सदर मागणीला प्रतिसाद न मिळाल्यास श्री ओंकार पांडे यांनी असे सांगितले की वेळप्रसंगी सदर प्रकरण न्यायालया चे निदर्शनास आणले जाईल आणि सदर जागा हे शासकीय असून ग्रामपंचायत मार्फत अतिक्रमण धारकांना खोटे नमुना क्रमांक आठ बनवून दिल्याचे हफीज खान यांनी सांगितले आहे सदर प्रकरणाला गावकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद असल्याचे दिसून येत असून वडनेर भोलजी ग्रामपंचायत मार्फत काय कार्यवाही होणार याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे
