रेल्वे सुरक्षा बलाचे पोउनि यांचे धाडस, महिलेचे वाचवले प्राण ,चाळीसगाव रेल्वे स्थानकावर घडली घटना

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0




भुसावळ प्रतिनिधी जुबेर मन्यार

    चाळीसगावहून जळगावकडे जाणारी काशी एक्स्प्रेस गाडीत चढताना एका प्रवाशी महिलेचा तोल गेला  आणि ही महिला खाली पडण्यापूर्वीच गस्तीवर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पाटील यांनी  महिलेस सावरले आणि तिचे प्राण वाचवले. सदरील  घटना १ नोव्हेंबर रोजी चाळीसगाव स्टेशनवर घडली. पांडुरंग पाटील असे ह्या धाडसी पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.  सध्या दिवाळीनंतर रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. स्टेशनवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून रेल्वे पोलिसांची २४ तास गस्त सुरू आहे. मंगळवारी चाळीसगावहून जळगावकडे येणारी काशी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १५०१७) ने स्टेशनवर दोन मिनिटांचा थांबा घेतल्यावर, चाळीसगावकडे मार्गस्थ होत असताना. 
    त्याचवेळी एक महिला आपल्या पाच वर्षाच्या मुलीसह डब्यात चढण्याचा प्रयत्न करीत होती. महिलेने पहिल्यांदा मुलीला आत चढविले. मात्र, स्वतः आत चढताना त्या महिलेचा दरवाज्यावरील  एक हात सुटल्याने, त्या खाली पडण्याची शक्यता होती. याच वेळी गस्तीवर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता, या महिलेला आत ढकलले. त्यामुळे महिला खाली पडता पडता वाचली.आणि मोठी हानी टळली. काही क्षणांचा हा थरार पाहताना प्रवाशांचेही हृदयाचे ठोके चुकले होते. 
    यानंतर महिला सुखरूप जळगावकडे रवाना झाली. महिलेचा जीव वाचविल्याबद्दल पांडुरंग पाटील यांचा सुरक्षा बलाचे पोलीस कर्मचारी रेहान अहमद, गोविंद राठोड, एसआय नहार यांनी सत्कार केला. पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पाटील यांनी वेळेवर दाखवलेले धाडस हे सद्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे आणि जनसामान्यात त्यांचे खूप कौतुक केले जात आहे

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)