विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या
झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की ( शेख रफिक शेख रशीद वय 30) रा. शिवाजी नगर मलकापूर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाने विषारी औषध प्राशन केले होते. रफिक याने विषारी औषध प्राशन केल्याचे परिवारातील सदस्यांच्या लक्षात आले. तरुणाला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तरुण हा मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रफिक हा विवाहित असून त्याला दोन मुली, एक 2 वर्षीय तर एक 4 वर्षीय, वडिलांच्या जाण्याने दोन्ही मुली पोरक्या झाले आहेत. रफिकच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रफिक च्या पश्चात पत्नी, 2 मुली, आई - वडील, 3 भाऊ, 2 बहिणी असा बराच आप्त परिवार आहे. घटनेचा प्राथमिक तपास, पी. एस. आय बालाजी सानप, पो. कॉ. सुभाष सरकटे यांनी केला तर घटनेचा पुढील तपास पो. निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.
