![]() |
बुडणाऱ्याला ट्यूबचा आधार! एनडीआरएफ'ची चित्तथरारक प्रात्यक्षिके |
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सोमवारपासून राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर सुरू झाले आहे. राज्याच्या २० विद्यापीठांमधील ८५६ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
एनडीआरएफच्या ५० तज्ज्ञांकडून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत. बुधवारी जळगाव शहरातील मेहरूण तलावावर या तज्ज्ञांनी पूर बचाव यंत्रणेची माहिती दिली व प्रात्यक्षिके दाखवली. या वेळनिरीक्षक सुशांतकुमार शेट्टी, सहायक उपनिरीक्षक विजय म्हस्के, प्रशिक्षक वैभव शेडोळे, नीलेश जाधव, अभय येवले, सुशील अस्वले, सागर चव्हाण, वैभव राऊत, अभिजित कुपे, लालचंद भोसले, देविदास गीते, योगेश थोरात, सभा नारायण, योगेंद्र चौधरी, मच्छिंद्र माने, मध्यवाळ डिके यांनी मार्गदर्शन केले. मेहरूण तलावावर कुलसचिव डॉ. विनोद पाटील, डॉ. सचिन नांद्रे, डॉ. किशोर पवार, डॉ. नितीन तेंडुलकर, प्रा. समीर नारखेडे, डॉ. प्रवीण रोकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

