गाडगेबाबांचा ६६ व्या स्म्रुतीदिनी परीट बांधवाकडुन अभिवादन.

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 



जामनेर प्रतिनिधी -

 बुरसटलेल्या जुनाट रुढी परंपरा प्रथा तसेच अंधश्रद्धा यांसारख्या थोतांडावर आपल्या खास वर्हाडी भाषेतुन समाज प्रबोधन करणारे थोर समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा हे समाज प्रबोधनाचे चालते बोलते विद्यापीठ म्हणूनही प्रसिद्ध आहेत. गाडगेबाबांनी बहुजन समाजात मोठ्या प्रमाणात पसरलेले रोग, धर्म मार्तंडांचे सावट व अंधश्रद्धांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी तब्बल अर्ध शतक अथक परिश्रम घेतले. शिक्षण व स्वच्छतेचा फायदा तसेच अज्ञाना पासून नुकसान किर्तनाच्या माध्यमातून लोकांना पटवून दिले. काम केल्याशिवाय कुठेही खाऊ नये. असा त्यांचा कटाक्ष होता. 

    म्हणूनच ते ऐतखाऊ समाजावर तुटुन पडत. कर्ज काढून लग्न करू नका. फाटके कपडे घाला पण शिका. मुक्या गरीब प्राण्यांची देवदेवतांच्या नावाने बळी देऊ नका. दारु किंवा इतर प्रकारची व्यसनाधीनता टाळुन संसाराचा होणाऱा विनाश करू नका . गरीबांना शिक्षण भुकेल्यांना अन्न, नागड्यांना वस्र, रोग्यांना औषध, हि दशसुत्री मांडुन असा हा  रोकडा मानवता धर्म जोपासला.बाबांनी अनेक गरीब मुला मुलींची लग्ने लावुन देत बेघरांसाठी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या. गरीब विद्यार्थ्यांसाठी वस्ती ग्रुहे सुरू केली. व्रुद्धांसाठी आश्रम उघडले तसेच हुंड्यासारख्या प्रथेला कडाडून विरोध केला. अशा परीवर्तनवादी  व जाती प्रथेविरुद्ध आवाज उठविणार्या संत गाडगेबाबांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील वाकी रोड भागात असलेल्या साईनाथ नगरातील भव्य पटांगणावर एक छोटेखानी स्म्रुती दिनाचा कार्यक्रम परीट(धोबी) समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. 

समाजातील जेष्ठ कार्यकर्ते  दशरथ हरी राऊत, यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी भिका ज्ञानेश्वर कोकाटे, वसंत परीट, हिराचंद देवचंद बुंदेले,बाबुराव रोकडे, सुभाष शिरसाठ, अरुण फकिरा रोकडे, अनिल श्रावण शिरसाठ, योगेश परीट, श्रावण शिरसाठ, बबन बाविस्कर, योगेश रोकडे, नितीन महाले, गोपाळ शिरसाठ, भरत नेरकर, गजानन शिरसाठ, सुनिल शिरसाठ, डॉ. शरद निसळकर, भाऊराव रोकडे, किरण रोकडे, विजय शिरसाठ, ज्ञानेश्वर लोंढरे, आदित्य शिरसाठ अरुण ठाकरे, विनोद इंगळे, आदी समाज बांधव उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)