`अकोला नांदेड-अमृतसर विशेष गाडीत बदल करण्यात आला असून आता ही गाडी नांदेड येथून २७ आणि २८ डिसेंबर ला सुटणार आहे. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हजूर साहिब नांदेड - अमृतसर (०४६३९) विशेष गाडी हजूर साहिब नांदेड येथून दि. २३ आणि २४ डिसेंबर, २०२२ ला रात्री २३.१० वाजता सुटेल आणि पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, शेगाव, खांडवा, इटारसी, ग्वालीअर, आग्रा, न्यू दिल्ली, पानिपत, राजपुरा, जालंधर मार्गे अमृतसर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ०९.३० वाजता पोहोचेल असे कळविले होते.
`यात बदल करण्यात आला आहे, तो पुढील प्रमाणे बदलानुसार, गाडी क्रमांक ०४६३९ हजूर साहिब नांदेड अमृतसर विशेष गाडी हजूर साहिब -नांदेड येथून दिनांक २७ आणि २८ डिसेंबर, २०२२ ला रात्री २३.१० वाजता सुटेल आणि पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, ग्वालीअर, आग्रा, न्यू दिल्ली, पानिपत, राजपुरा, जालंधर मार्गे अमृतसर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ०९.३० वाजता पोहोचेल. सदर बदल प्रवाशांनी लक्षात घ्यावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. ग क्रमांक ०४६४० अमृतसर-हजूर साहिब नांदेड विशेष गाडी पूर्वी घोषित केल्या नुसारच अमृतसर येथून दि. २२ आणि २३ डिसेंबर, २०२२ ला सकाळी ०४.२५ वाजता सुटेल आणि जालंधर, राजपुरा, पानिपत, न्यू दिल्ली, आग्रा, ग्वालीअर, इटारसी, खांडवा, अकोला, वाशीम, हिंगोली, पूर्णा मार्गे हजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १५.२० वाजता पोहोचेल. या गाडीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या गाडीत द्वितीय श्रेणी शय्या, तृतीय श्रेणी वातानुकुलीत, जनरल असे २० डबे असतील.

.jpg)