मलकापूर : स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मलकापूर यांच्या वतीने लीलाधर भोजराज चांडक महाविद्यालय, मलकापूर येथे नुकतेच दहावी व बारावीत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
दहावी, बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे कोणत्या क्षेत्रात व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर भविष्यात यशस्वी होऊन स्वतःसोबतच आपल्या कुटुंबाची व पर्यायाने सभोवतालच्या समाजाची आर्थिक व सामाजिक प्रगती
घडवू शकतो. बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्याकरिता अभ्यास कसा करावा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा समजण्यास वापरण्यास कठीण याबद्दल आपल्या मनात विनाकारण भीती तयार करून घेतलेली असते. त्यावर भीती नाहिशी कशी होते, याबद्दल करिअर मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करीत असतांना प्रा. रमाकांत चौधरी यांनी मत व्यक्त केले. इतर क्षेत्रात शिक्षण घेऊन नोकरीसाठी वणवण भटकण्याचे टाळता यावे, याकरिता आपले ध्येय काय असावे. याबद्दल माहिती प्रा. साकेत पाटील, यांनी दिली.

.jpeg)