-----------------------------------
राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या सोमवार दिनांक 19 डिसेंबर 2022 पासुन नागपुर येथे सुरवात होणार आहे . विदर्भातील विविध प्रश्नांवर स
विस्तर चर्चा होऊन त्यांच्या वर निर्णय घेण्यात यावे या करिता नागपुर येथील विधान भवन येथे हिवाळी अधिवेशन घेतल्या जाते . सदरच्या हिवाळी अधिवेशनावर मुस्लीम फकीर जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गामध्ये करण्यात यावा या मागणी करिता मुस्लिम शाह फकीर समाज या सामाजिक संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . युवकांच्या शैक्षणिक दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या समाजाच्या सदरच्या मागणी करीता राज्यभरात शाह फकीर समाज नागपुर येथे एकवटणार आहे . आक्रोश मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के . जी . शाह हे करणार आहे . तर मोर्चात समाजाचे एकमेव आमदार डॉ फारुक शाह , शाह समाजाचे जेष्ठ नेते हाजी कॉ रहेमान शाह , हाजी वहाब शाह , उस्मान शाह , महेमुद शाह यांच्या सह राज्यभरात विविध राजकिय व सामाजिक संघटनेत असलेले समाजाचे नेते उपस्थित राहणार आहे . सदरचा मोर्चा यशस्वी करण्या करिता
संघटनेचे संस्थापक महासचिव जाकीर शाह व प्रदेश अध्यक्ष लुकमान शाह यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ अध्यक्ष मुश्ताक शाह यांच्या सह राज्यातील संघटनेचे पदाधिकारी मेहनत घेत आहे . आक्रोश मोर्चा करिता गावं खेड्यात तरुणां कडुन मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे . मुस्लीम शाह फकीर जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात करण्यात यावा मागणी करीता विधान भवन नागपुर येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चाची सुरवात गुरुवार दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता यशवंत स्टेडियम येथुन होणार आहे . सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या तरुणां करिता अतिशय महत्वपुर्ण असलेल्या मागणी करीता काढण्यात येणाऱ्या सदरच्या आक्रोश मोर्चात राज्यभरातील शाह फकीर समाजाने सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र मुस्लिम शाह समाज संघटनेच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे .
