मलकापुरातील लासुरा शिवारात बिबट्याची दहशत

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


    मलकापूर तालुक्यातील लासुरा शिवारात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. गुरुवारी त्याने वासरीचा फडशा पाडल्यानंतर एकच खळबळ उडाली. तालुक्यातील लासुरा, निमखेड व तालुक्याच्या सीमेवरील पिंपळखुटा शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावराची चर्चा सुरू होती. या शिवारात नदी व नाले कोरडे पडल्याने बिबट्याचा मुक्काम वाढल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. लासुरा शिवारात विश्वनाथ नारायण अढाव यांच्या शेतात नेहमीप्रमाणे बांधण्यात आलेल्या गायीच्या वासराचा जंगली जनावराने फडशा पाडल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या घटनेमुळे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली. माजी सरपंच केशवराव गारमोडे यांनी या माहितीस दुजोरा दिला आहे. वनविभागाने या श्वापदाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)