जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील गेल्या आठ महिन्यापासून संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ पेन्शन योजना दिव्यांग पेन्शन योजना या दुर्बल घटकात असणाऱ्या गरजवंतांचे पेन्शन विषयी दोन हजार अर्ज प्रलंबित (पडून )आहे महाविकास आघाडी कालखंडात समिती गटन कडून दर महिन्याला या सर्व विषयाला समितीने न्याय देण्याचे काम केले परंतु मिधे व खोके सरकार आल्यापासून समिती रद्द करण्यात आल्याने गेल्या आठ महिन्यापासून तहसीलदार अरुण शेवाळे यांनी कोणती मीटिंग न बोलावल्याने संबंधित अर्ज तहसील कार्यालयात पडून आहे या दुर्बल घटकांना न्याय मिळावा म्हणून शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देऊन या दुर्बल घटकांना आठवड्यात मिळाल्यास भीक मागो आंदोलन करण्याचा कडक इशारा निवेदनात दिला आहे
या निवेदनात म्हटले आहे की गेल्या आठ महिन्यापासून संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ पेन्शन योजना दिव्यांग पेन्शन योजना या सर्व दुर्बल घटक असणाऱ्या गरजवंतांचे दोन हजार अर्ज पडून आहे याविषयी समिती जाहीर होतील तेव्हा होतील परंतु एक आठवड्यात तहसीलदार अरुण शेवाळे यांची अध्यक्ष खाली मीटिंग घेऊन प्रलंबित अर्ज मंजूर करावे अन्यथा भीक मांगो आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेना उपजिल्हाधिकारी राहुल चव्हाण शिवसेना शहर प्रमुख अतुल सोनवणे युवा सेना तालुका अधिकारी नरेंद्र धुमाळ शहर अधिकारी विशाल भोई तालुका उपसंघटक सुधाकर सराफ उप शहर प्रमुख दीपक माळी कैलास माळी सईद शेख सुरेश चव्हाण खुशाल पवार माजी शिवसेना शहर प्रमुख पवन माळी माजी शिवसेना तालुकाप्रमुख एडवोकेट प्रकाश पाटील अल्पसंख्या आघाडीचे उस्मान शेख साबीर शेख किरण पाटील गोपाल सूर्यवंशी आजीम शेख जितू झालटे अमोल रोकडे यांच्यासह शिवसेना व युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

