-----------------------------------
विदर्भ व मराठवाडा सिमा ला लागून धामणगांव बढे पासून काही अंतरावर असलेल्या गिरडा घाट ठिकठिकाणीच्या वळणावर एकाही घाटात ठिकाणी दिशा फलक नसल्याने वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण झाले आहे . त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन गिरडा घाटात दिशा फलक लावण्यात यावे , अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते • यांच्यासह वाहनधारकांनी केली आहे . बुलढाणा जवळचा जिल्हा गिरडा घाट औरंगाबाद व बुलढाणा या दोन जिल्ह्यांत आहे . सावळदबारा , घाणेगाव , मोलखेडा , टिटवी , पळसखेडा , मूर्ती , पिपळवाडी , देव्हारी , हिवरी , महालब्धा , नांदातांडा तसेच मोताळा तालुक्यातील कुऱ्हा, गोतमारा,कोऱ्हाला बाजार पान्हेरा खेडी,सहा या परिसरातील गावांतील ग्रामस्थांना जवळचा जिल्हा म्हणजे बुलढाणा आहे . घाटात दिशा फलक नसल्याने रात्रीच्या वेळेस तर वाहन
धारकांना अतिशय काळजीपूर्वक वाहन चालवूनही मार्गाचा अंदाज येणे कठीण होते .
श्री चक्रधर स्वामी मंदिर सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे श्री चक्रधर स्वामी मंदिर आहेत . दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येथे येतात . संबंधित विभागाने दिशा फलक लावणया ची मागणी परिसरातील सावळदबारा सह कुऱ्हा गोतमारा या परिसरातील नागरिक सह वाहनधारकांतून होत आहे .
वाहन कोसळण्याची भीती गिरडा घाट रस्त्याच्या बाजूला खोल दरी आहे . कठडे नसल्यामुळे खोल दरीत वाहन कोसळण्याची भीती असते . यापूर्वी देखील घाटात वाहने कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत . सावळदबारासह परिसरातील ग्रामस्थांना बुलढाणा येथे जाण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने गिरडा घाटातून ग्रामस्थांना दररोज ये - जा करावी लागते . दिशाफलक नसल्याने अनेक वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नाही . त्यामुळे अचानक समोरून वाहन येत असल्याने अपघाताची भीती सतत असते . त्यात हा संपूर्ण भाग डोंगर आहेत . अनेक वळणावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
