जळगाव : शहरातील जुने बसस्थानक भागामध्ये जुन्या वादातून आकाश ऊर्फ धडकन सुरेश सपकाळे (वय ३०, रा. कोळीपेठ) याचा खून केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी गोपाल ऊर्फ अण्णा कैलास सैंदाणे (२८, रा. बालाजी मंदिर मागे, जळगाव) याला अटक केली असून, त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती त्याला २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जुन्या वादातून गोपाल सैंदाणे याच्यासह दोनजणांनी आकाश सपकाळे, सागर सुरेश सपकाळे व सागर आनंद सपकाळे यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी जुने बसस्थानक भागात घडली होती. यात आकाश याचा मृत्यू झाला होता.. या घटनेमुळे खळबळ उडाली होती, पोलिसांनी तातडीने हालचाली करून आरोपीला अटक करण्यात यश मिळवले होते.

.jpeg)