पद्मश्री डॉ.व्हि. बी. कोलते कॉलेजमध्ये उद्योजकता शिबिर संपन्न

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


    मलकापूर भारत सरकारच्या उद्योजकता विकास संस्था, (EDII) अहमदाबाद व केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय, नवी दिल्ली (MSME), इंडो जर्मन टूल्स रूम् (IGTR) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. भि. कोलते कॉलेज ऑफ इंजिनीरिंगमध्ये १६ डिसेंबरला ऑनलाईन वेबिनार व १७ डिसेंबरला ऑफलाईन उद्योजकता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    यामध्ये भारत सरकारच्या उद्योजकता विकास संस्था, (EDII) अहमदाबादच्या वतीने डॉ. प्रशांत सक्सेना आणि चिराग पाटील यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन महाविद्यालयाचे विद्युत अभियांत्रिकी शाखेचे प्रा. मनोज वानखडे व कॉम्पुटर विभागाचे प्रा. गिरीश पाटील यांनी केले. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. युगेश खर्चे यांनी केले. तसेच उद्योजकता जागरुकता कार्यक्रमाच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय, नवी दिल्ली (MSME) इंडो जर्मन टूल्स रूम् (IGTR) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राजेश चंचलानी , संचालक (CBFCLtd)व अनिकेत देशमुख, अभियंता (IGTR) औरंगाबाद यांनी ऑफलाईन उद्योजकता मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे विद्युत अभियांत्रिकी शाखेचे प्रा. मनोज वानखडे व यंत्र अभियांत्रिकी शाखेचे प्रा. दिपक खरात यांनी केले होते.

कार्यक्रमाला प्रा. रमाकांत चौधरी, प्रा. नितीन खर्चे, प्रा. संदीप खाचणे, प्रा. संतोष शेकोकार, प्रा.राजेश सरोदे, प्रा.योगेश सुशीर, प्रा. सुदेश फरपट आदी विभागप्रमुख व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)