मंगळवारी पाहता येणार उल्कावर्षावनुसत्या डोळ्यांनी होईल दर्शन : वर्षातील सर्वात सुंदर उल्कापात

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0



अकोला : वातावरणातील बदलामुळे सद्यस्थितीत आकाशात काही स्थितीत बदल होत असतानाच १३ व १४ डिसेंबरला मिथुन राशीसमुहातून होणाऱ्या उल्का वर्षावाचा आनंद घेता येणार आहे. वर्षातील सर्वात सुंदर हा उल्कापात रात्रीच्या प्रारंभापासून पहाटेपर्यंत नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. मिथुन राशीसमुहातील उल्कापातास स्वर्गद्वारातील उल्कावर्षाव असेही संबोधतात.

सायंकाळी संधिप्रकाश कमी कमी होत जाऊन आकाशात एकेक तारका विराजमान होत असते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पूर्व क्षितिजावर दिसणारे सात ठळक तारकांचे मृगनक्षत्र आकाशगंगेच्या पट्ट्यात बघून यांच्या जरा डाव्या बाजूला असलेल्या मिथुन राशीसमुहातून विविध रंगांच्या प्रकाशरेखा चमकताना दिसतील. त्यांना आपण तारा तुटला' असे संबोधतो. परंतु त्याचा एखाद्या तान्याशी काहीएक संबंध नसतो, तर ती एक उल्का असते. सूर्यकुलाचे घटक असलेले आपल्या भ्रमण कक्षेत फिरणारे धूमकेतू किंवा लघुग्रहांचे काही वस्तूकण मागे सुटतात.

चौकट

म्हणून म्हणतात 'गेट वे ऑफ हेवन'

■ या उल्का वर्षावाला स्वर्गातील संबोधित करण्याचे कारण आकाशात क्रमांक तीन येणाऱ्या मिथुन राशीतील दोन ठळक तारका कॅस्टर आणि पोलूक्स असून याच्या समोरच्या प्रोसोआन व गोमेईझा या चार तारकांना जोडले की, आकाशात एक समांतरभुज चौकोन तयार होतो. यालाच आपण स्वर्गद्वार अर्थात गेट वे ऑफ हेवन म्हणण्याचे कारण म्हणजे आपल्या चंद्र, सूर्याचा व सूर्यमालेतील सर्व ग्रहाचे भ्रमण याच मार्गावरून होत असते.

आपली पृथ्वी जेव्हा या कक्षेतून जाते त्यावेळी जवळ असलेल्या वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे आपल्याकडे ओढल्या जातात आणि मग घर्षणामुळे पेट घेऊन वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाशरेखा चमकताना दिसतात. एकाचवेळी अनेक उल्कांची बरसात अतिशय मनमोहक अशी दिसते.

" असा हा वर्षाअखेरचा अनोखा आकाश नजारा आपल्याला घरूनसुद्धा आरामात बघता येईल असे विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी सांगितले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)