धामणगांव बढे ते फत्तेपूर मार्ग वर मोटारसायकल अपघातात दोन ठार

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0



धामणगांव बढे सादिक शेख 
    धामणगांव बढे पासुन काही अंतरावर देऊळगाव गुजरी  रस्त्यावर निवांत ढाब्या समोर दोन दुचाकी समोरा समोर धडकल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली . मोहसीन सांडू शेख वा त्याचे वडील सांडू हुसेन शेख रा . सावळतबारा ता .. सोयगाव जिल्हा औरंगाबाद हे दि . २२ रोजी दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास दुचाकी क्र . एम एच २० एफ डी २८३३ वरून फत्तेपूर कडे येत असतांना पिंपळगाव जवळील निवांत ढाब्या समोर फत्तेपूर कडून देऊळगाव कडे जाणाऱ्या मनोहर पांडूरंग दांडगे रा . डाभा ता . सोयगाव जिल्हा औरंगाबाद  यांनी त्यांची दुचाकी एम एच सी एल ६१६६ भरधाव चालवून समोरील दुचाकीस धडक दिली .
    यात सांडू हुसेन शेख यांचा व मनोहर दांडगे यांचा जागीच मृत्यू झाला तर मोहसीन शेख व संजय हरदास जाधव रा . जामठी ता . सोयगाव यांना जबर दुखापत झाली याबाबत पहूर पोलीस स्टेशनला भांदवि ३०४ ( अ ) , २७ ९ , ३३७ ३३८४२७ मो.वा.का. क . १३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो. नि. प्रतापा इंगळे यांचे मार्गदर्शना खाली फत्तेपुर पोलिस चौकी चे पो.हे. काँ किरण शिंपी. प्रविण चौधरी. हे करीत आहे .

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)