मलकापूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायत निवडणुकीकरिता शासकीय यंत्रणा सज्ज झालेल्या असून निवडणुकीच्या आधल्या दिवशी तहसील कार्यालय मलकापूर येथून सर्व कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख व तहसीलदार राजेश सुरडकर यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक अधिकारी बाळासाहेब दराडे, चंद्रशेखर पाटील, गोविंद वाघ यांच्या सह सर्व कर्मचाऱ्यांनी शिस्तबध्द पध्दतीने केंद्राध्यक्ष व त्यांच्या चमुना मतदान साहित्याचे वाटप केले. त्यात कंट्रोल युनिट बॅलेट युनिट, विविध याद्या, वेगवेगळे नियुक्त
अर्ज व अन्य आवश्यक साहित्य तपासणी करून देण्यात आले.
मलकापूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीसाठी होऊ घातलेल्या या ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रियेसाठी जवळपास २०० च्यावर शिक्षक व अन्य विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत. त्यात बोरखेड, पिंपळगाव महादेव, झोडगा, हरसोडा, काळेगाव, पान्हेरा, बहापुरा इत्यादी ग्रामपंचायत निवडणुका साठी मतदान रविवार १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. या निवडणूक चमू सोबत सुरक्षा रक्षक म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांना सुध्दा करण्यात आलेले
