नांदुरा तालुक्यातील मौजे माळेगाव येथील जिल्हा परिषद शाळे मध्ये शिक्षक देणेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज 15/ 12/ 2022 रोजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदुरा यांना आंदोलनाचा इशारा तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजेश रामराव काळे यांनी दिला गटशिक्षणाधिकारी यांना वारंवार निवेदन स्मरणपत्र देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची माहिती गटशिक्षणाधिकारी यांनी निवेदन देणाऱ्यांना माहिती अथवा कुठल्याही प्रकारचे शिक्षक फिरकले सुद्धा नाही जिल्हा परिषद शाळेमध्ये एक ते चार वर्ग असून शिक्षक संख्या तीन आहे व दोन वर्ग एकाच वर्गामध्ये बसवण्यात येतात व त्या कारणास्तव मुलांना काही कळेनासे होत आहे त्या अर्थाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याची भविष्यामध्ये वेळ येऊ शकते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून आपण लवकरात लवकर एक शिक्षक नियुक्त करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच नांदुरा तालुक्यातील बहुसंख्य जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी असून आपण लवकरात लवकर या शाळेवर शिक्षक संख्या कमी असेल तेथे शिक्षक रुजू करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक 21 /12 /2022 रोजी शिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदुरा यांच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशी माहिती एका पत्राद्वारे राजेश रामराव काळे यांनी माहिती दिली
