*भिक्षा घेऊन दुआ देणारे आता रक्त दाते झाले - फारुक शेख**नशिराबाद शाहबिरादरीचा स्तुत्य उपक्रम ५१ बॉटल जमा

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

नशिराबाद येथील बदिओद्दीन अहमदशाह रहेमतुल्ला अलै. यांच्या जयंती निमित्त मुस्लिम समाजातील फकीर जे भिक्षा मागून आपले कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात त्यांनी स्वयफर्तीने आपल्या शाह बिरादरी चे तरुण व प्रौढ यांचे ५१ बॉटल रक्तदान जळगाव च्या रेडप्लस या रक्त पेढीला देऊन समाजात एक आगळा वेगळा संदेश दिला.
नशिराबाद येथील शाह बिरादरी ने आपल्या हॉल मध्ये हा कार्य क्रम आयोजित केला होता. 
कार्क्रमा च्या अध्यक्ष पदी जिल्हा मणियार बिरदारीचे अध्यक्ष फारुक शेख,प्रमुख अतिथी मुफ्ती हारून नदवी, शिकलगार बिरादरीचे अन्वर खान, ईद गाह ट्रस्ट चे अनिस शाह,कवी साबीर मुस्तफाबादी व कासिम उमर होते.
मुफ्ती हारून यांनी पवित्र कुराण पठण केले व रक्त दानाचे महत्व विषद करून भिक्षा घेणारे दुआ देत असतात तोच धागा पकडून
फारुक शेख यांनी भिक्षा मागून दुआ देणारे आज रक्त दाते झाल्या बद्दल संपूर्ण शाह बिरादरीचे व खास करून रागिब ब्यावली, मास्टर सलीम शाह,फिरोज शाह, मसूद शाह, व अंध दाता फते मोहम्मद यांचे अभिनंदन केले.
साबीर मुस्तफा आबादि यांनी सूत्र संचालन केले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)